IPL 2023: वयाच्या चाळीशीतही अमित मिश्राची कमालीची फिल्डिंग, सूर मारत पकडला अफलातून कॅच, पाहा Video

आयपीएल 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून 40 वर्षीय अमित मिश्राने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शानदार फिल्डिंग करताना एक अफलातून झेल घेतला.
Amit Mishra Catch
Amit Mishra CatchDainik Gomantak
Published on
Updated on

Amit Mishra Catch: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील दहावा सामना शुक्रवारी (7 एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. एकाना स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात लखनऊने 5 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात 40 वर्षीय अमित मिश्रानेही शानदार कामगिरी केली.

अमित मिश्राने या सामन्यात एक अफलातून झेल घेतला.ज्याबद्दल सध्या चांगलीच चर्चा रंगली असून त्याच्या झेलाचा व्हिडिओही वेगात व्हायरल होत आहे. तसेच अनेक युजर्सने वय फक्त आकडा असतो अशा प्रतिक्रियाही या व्हिडिओवर दिल्या आहेत. मिश्राने घेतलेल्या या झेलाचा व्हिडिओ आयपीएलच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

Amit Mishra Catch
IPL 2023: लखनऊचा हैदराबादवर दणदणीत विजय! कृणाल पंड्याची 'ऑलराऊंड' कामगिरी ठरली मोलाची

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादच्या राहुल त्रिपाठीचा झेल मिश्राने घेतला. झाले असे की 18 व्या षटकात त्रिपाठीने यश ठाकूरने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर फटका खेळला. पण फटका खेळताना त्याच्याकडून चूक झाली. त्यामुळे शॉर्ट थर्ड-मॅनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण करत असलेल्या मिश्राने सूर मारत हा चेंडू पकडला. त्यामुळे त्रिपाठीला 35 धावांवर बाद होऊन माघारी परतावे लागले.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास हैदराबादचा डाव 20 षटकात 8 बाद 121 धावांवरच संपला. हैदराबादकडून त्रिपाठीनेच सर्वाधिक धावा केल्या. तसेच अनमोलप्रीत सिंगने 31 धावांची खेळी केली, तर अब्दुल सामदने नाबाद 21 धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त कोणीही 20 धावांचा टप्पा ओलांडला नाही.

लखनऊकडून कृणाल पंड्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच अमित मिश्राने गोलंदाजीतही चांगली कामगिरी करताना एकाच षटकात वॉशिंग्टन सुंदर आणि आदिल राशीद यांना बाद केले. याशिवाय यश ठाकूर आणि रवी बिश्नोई यांनीही प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Amit Mishra Catch
IPL 2023: कोण आहे सुयश शर्मा? ज्यानं RCB विरुद्ध 3 विकेट्स घेत वेधलं लक्ष

तसेच 122 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊकडून कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. तसेच कृणाल पंड्याने 34 धावांची खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारीही केली. त्यामुळे लखनऊला विजय मिळवणे सोपे गेले. लखनऊने 16 षटकातच 5 विकेट्स गमावत 127 धावा करत सामना जिंकला.

अमित मिश्रा आयपीएलमधी यशस्वी गोलंदाज

अमित मिश्रा हा आयपीएलमधील एक यशस्वी गोलंदाज म्हणून ओळखला जातो. आयपीएलमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे.त्याने आत्तापर्यंत 155 आयपीएल सामन्यांमध्ये 168 विकेट्स घेतल्या आहेत.याशिवाय आयपीएलमध्ये तीन वेळा हॅट्रिक घेणाराही तो एकमेव गोलंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com