IPL 2023: 'सुदैवाने किंवा दुर्दैवाने, धोनी जाईल तिथे...', CSK विरुद्धच्या मॅचआधी पोलार्डची मोठी प्रतिक्रिया

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीबद्दल मुंबई इंडियन्सचा बॅटिंग कोच कायरन पोलार्डने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Kieron Pollard MS Dhoni
Kieron Pollard MS DhoniDainik Gomantak
Published on
Updated on

Kieron Pollard on MS Dhoni: शनिवारी (8 एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत 12 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात रंगणार आहे. वानखेडे स्डेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्डने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या धोनीचा हा अखेरचा आयपीएल हंगाम असल्याची चर्चा आहे. त्यामुळे धोनी कर्णधार असेलल्या सीएसकेला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. शनिवारी देखील वानखेडे स्टेडियमवर असाच प्रतिसाद चाहत्यांकडून सीएसकेला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचबद्दल पोलार्डने आपले मत व्यक्त करताना सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या आयपीएल हंगामाशी तुलना केली आहे.

Kieron Pollard MS Dhoni
IPL 2023 Video: एका ओव्हरमध्ये 5 चौकार अन् 25 चेंडूत फिफ्टी! जयस्वालची DC विरुद्ध तोडफोड बॅटिंग

पोलार्डने इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार म्हटले आहे की 'सुदैवाने किंवा दुर्दैवाने, जेव्हाही तो खेळेल, जिथेही तो जाईल, त्याला घरच्या मैदानासारखा पाठिंबा असेल. यामागे कारण म्हणजे त्याने जी कामगिरी केली आहे. आम्ही असा अनुभव काही वर्षांपूर्वी घेतला आहे, जेव्हा आमचा आयकॉन सचिन तेंडुलकर अखेरच्या हंगामात खेळलेला. आम्ही भारतात कुठेही गेलो होते, तिथे आम्हाला पाठिंबा मिळाला होता.'

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर 2013 साली अखेरचा आयपीएल हंगाम खेळला होता. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. 2013 साली मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्याच चेन्नई सुपर किंग्सलाच पराभूत करत पहिल्यांदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते.

Kieron Pollard MS Dhoni
IPL 2023: वयाच्या चाळीशीतही अमित मिश्राची कमालीची फिल्डिंग, सूर मारत पकडला अफलातून कॅच, पाहा Video

दरम्यान, शनिवारी होणाऱ्या सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्सचा या हंगामातील दुसराच सामना आहे, तर सीएसकेचा तिसरा सामना आहे.

मुंबईने पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना केला आहे, तर सीएसकेने पहिला सामना पराभूत झाला आहे, तर दुसरा सामना जिंकला आहे. त्यामुळे या सामन्यातून मुंबई विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल, तर सीएसके विजयी लय कायम राखण्याच्या हेतूने मैदानात उतरतील.

आत्तापर्यंत या दोन संघांमध्ये आत्तापर्यंत 34 सामने झाले आहेत. यातील 20 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आहे, तर 14 सामने सीएसकेने जिंकले आहेत. गेल्या तीन हंगामातील सामन्यांचा विचार केल्यास या दोन संघात 6 सामने झाले असून तीन मुंबई इंडियन्सने आणि सीएसकेने तीन सामने जिंकले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com