Shubman Gill
Shubman Gill Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये रेकॉर्ड्सचा पाऊस, खेळाडूंनी केली कमाल!

Manish Jadhav

IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करुन पाचव्यांदा IPL ट्रॉफीवर नाव कोरले.

आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीने कर्णधार म्हणून इतिहास रचला. या सामन्यात गुजरात टायटन्सने 4 गडी गमावत 214 धावा केल्या, मात्र पावसामुळे चेन्नईला विजयासाठी 15 षटकांत 171 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले होते.

दरम्यान, सीएसकेच्या विजयाचा नायक रवींद्र जडेजा ठरला, ज्याने शेवटच्या दोन चेंडूंमध्ये एकूण 10 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावण्यात यश मिळवले. आयपीएल 2023 मध्ये खेळाडू आणि संघांनी अनेक विक्रम केले. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही विक्रमांबद्दल...

1. एका मोसमात सर्वाधिक षटकार

आयपीएल 2023 च्या मोसमात फलंदाजांनी भरपूर षटकार मारले. याचा परिणाम असा झाला की, या मोसमात षटकारांचा विक्रम मोडला गेला. आयपीएल 2023 मध्ये एकूण 1124 षटकार मारले गेले. याआधीचा विक्रम 2022 च्या हंगामात नावावर होता, ज्यामध्ये दहा संघांच्या फलंदाजांनी मिळून एकूण 1062 षटकार मारले होते.

2. एका हंगामात सर्वाधिक शतके

IPL 2023 मध्ये एकूण 12 शतके झळकावली गेली आहेत, जी कोणत्याही एका हंगामातील सर्वाधिक आहे.

यापूर्वी, आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक 8 शतके झळकावली होती. याशिवाय, 2016 मध्ये 7 शतके झळकावली होती. IPL 2023 मध्ये शुभमन गिलने (Shubman Gill) सर्वाधिक तीन शतके तर विराट कोहलीने दोन शतके झळकावली.

IPL 2023 मध्ये केलेल्या शतकांची यादी

1. शुभमन गिल - 129 धावा गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, अहमदाबाद

2. विराट कोहली - 101* धावा RCB विरुद्ध गुजरात टायटन्स, बंगळुरु

3. शुभमन गिल - 104* धावा, गुजरात टायटन्स विरुद्ध आरसीबी, बंगळुरु

4. कॅमेरॉन ग्रीन - 100* धावा, MI विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, मुंबई

5. हेन्रिक क्लासेन - 104 धावा, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आरसीबी, हैदराबाद

6. विराट कोहली - 100 धावा, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध एसआरएच, हैदराबाद

7. शुभमन गिल - 101 धावा, गुजरात टायटन्स विरुद्ध एसआरएच, अहमदाबाद

8. प्रभसिमरन सिंग - 103 धावा, पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली

9. सूर्यकुमार यादव - 103* धावा, मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स, मुंबई

10. यशस्वी जयस्वाल - 124 धावा, राजस्थान रॉयल्स विरुद्ध एमआय, मुंबई

11. व्यंकटेश अय्यर - 104 धावा, कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध एमआय, मुंबई

12. हॅरी ब्रूक - 100* धावा, सनरायझर्स हैदराबाद वि केकेआर, कोलकाता

3. शुभमन गिलने या मोसमात अनेक विक्रम केले. गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या गिलने क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 60 चेंडूत 129 धावांची तूफानी खेळी खेळली, ज्यात सात चौकार आणि दहा षटकारांचा समावेश होता.

या संस्मरणीय खेळीमुळे गिल आयपीएलच्या प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. गिलने सीएसकेविरुद्ध 122 धावा करणाऱ्या वीरेंद्र सेहवागला मागे सोडले. गिल प्लेऑफमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडूही ठरला.

तसेच, गिल आयपीएल प्लेऑफमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. गिलने 23 वर्षे 260 दिवसांच्या वयात मुंबई इंडियन्सविरुद्धच्या प्लेऑफ सामन्यात शतक झळकावले.

तसेच, आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याच्या बाबतीत गिलने रजत पाटीदार आणि ऋद्धिमान साहा यांची बरोबरी केली. साहा आणि पाटीदार यांनीही 49-49 चेंडूत शतके झळकावली होती.

आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक षटकार (प्लेऑफ)

10- शुभमन गिल (जीटी) वि एमआय, अहमदाबाद, 2023

8- ऋद्धिमान साहा (पंजाब किंग्स) वि केकेआर, बंगळुरु, 2014

8- ख्रिस गेल (RCB) विरुद्ध SRH, बंगळुरु, 2016

8- वीरेंद्र सेहवाग (PBKS) विरुद्ध CSK, मुंबई, 2014

8- शेन वॉटसन (CSK) विरुद्ध SRH, मुंबई, 2018

आयपीएल प्लेऑफमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या

129- शुभमन गिल (जीटी) वि एमआय, अहमदाबाद, 2023

122- वीरेंद्र सेहवाग (पंजाब किंग्स) वि CSK, मुंबई, 2014

117* - शेन वॉटसन (CSK) विरुद्ध SRH, मुंबई, 2018 फायनल

115* - ऋद्धिमान साहा (पंजाब किंग्स) विरुद्ध केकेआर, बंगळुरु, 2014 अंतिम

प्लेऑफमधील सर्वात वेगवान शतक

ऋद्धिमान साहा (पंजाब किंग्स विरुद्ध केकेआर) - 49 चेंडू (2014 अंतिम)

रजत पाटीदार (RCB vs लखनऊ सुपरजायंट्स) - 49 चेंडू (2022 एलिमिनेटर)

शुभमन गिल (गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स) - 49 चेंडू (2023 क्वालिफायर-2)

4. आकाश मधवालने त्याच्या पहिल्या आयपीएल हंगामात अप्रतिम कामगिरी केली. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या आकाशने या मोसमात एक खास विक्रम केला. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात मधवालने 5 धावांत 5 बळी घेतले.

आयपीएलच्या इतिहासातील कोणत्याही अनकॅप्ड भारतीय गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी. यासह, कोणत्याही आयपीएल प्लेऑफमधील ही सर्वोत्तम गोलंदाजी होती.

आयपीएलमधील अनकॅप्ड खेळाडूची सर्वोत्तम गोलंदाजी

5/5 - आकाश मधवाल (MI) वि LSG, चेन्नई, 2023

5/14 - अंकित राजपूत (KXIP) वि SRH, हैदराबाद, 2018

5/20 - वरुण चक्रवर्ती (KKR) विरुद्ध DC, अबू धाबी, 2020

5/25 - उमरान मलिक (SRH) विरुद्ध GT, मुंबई वानखेडे, 2022

आयपीएल प्लेऑफमधील सर्वोत्तम गोलंदाजी

5/5 - आकाश मधवाल (MI) वि LSG, चेन्नई, 2023

10/5- मोहित शर्मा (GT) वि MI, अहमदाबाद, 2023 Q2

4/13 - डग बोलिंगर (CSK) विरुद्ध डेक्कन चार्जर्स, मुंबई डीवाय पाटील, 2010

4/14 - जसप्रीत बुमराह (MI) विरुद्ध DC, दुबई, 2020 Q1

4/14 - धवल कुलकर्णी (GL) विरुद्ध RCB, बंगळुरु, 2016 Q1

5. राजस्थान रॉयल्सचा फलंदाज यशस्वी जयस्वालने IPL 2023 मध्ये अप्रतिम कामगिरी करत 14 सामन्यांमध्ये एकूण 625 धावा केल्या. या कामगिरीमुळे यशस्वी आयपीएलच्या कोणत्याही एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू ठरला.

त्याने 2008 च्या मोसमात 616 धावा करणाऱ्या शॉन मार्शचा 15 वर्ष जुना विक्रम मोडला. यशस्वीने कोलकाताविरुद्ध 13 चेंडूत अर्धशतक ठोकले, जे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक होते.

आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक

13 - यशस्वी जयस्वाल (राजस्थान रॉयल्स) विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, 2023

14- केएल राहुल (पंजाब किंग्स) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मोहाली, 2018

14- पॅट कमिन्स (कोलकाता नाइट रायडर्स) विरुद्ध मुंबई इंडियन्स, पुणे, 2022

आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा (अनकॅप्ड खेळाडू)

625 धावा - यशस्वी जयस्वाल, 2023

616- शॉन मार्श, 2008

516- ईशान किशन 2020

512- सूर्यकुमार यादव, 2018

480- सूर्यकुमार यादव, 2020

5. सर्वोच्च 200 अधिक स्कोअर

तसेच, इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामात धावांचा पाऊस पडला. या मोसमात एका डावात 37 वेळा दोनशे किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम आहे.

यापूर्वी 2022 च्या आयपीएल हंगामात एका डावात 18 वेळा 200 किंवा त्याहून अधिक धावा केल्या होत्या. 2018 च्या हंगामात, 15 प्रसंगी, एका डावात दोनशे किंवा त्याहून अधिक धावा केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT