इंस्टाग्राम रील्सने जगभरातील लोकांमध्ये एक वेगळी क्रेझ निर्माण केलीय. इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढविण्यासाठी अनेकजण अपार मेहनत घेताना दिसतात. वेगवेगळ्या विषयांवरच्या रील्स तयार केल्या जातात, पण प्रत्येक रील लोकांच्या पसंतीस पडेलच असे नाही.
लाईक, शेअर, व्ह्यूजच्या मारामारीत 'कंटेट इज किंग' हे वारंवार सिद्ध होताना दिसतेय. तरीही विषय हाताळणी, सादरीकरण आणि वेगळेपण याचा प्रत्येकाचा एक वेगळा फंडा आहे.
यावरच गोव्यातील नवोदीत इन्फ्लुएन्सर वर्धन कामत यांनी भाष्य केलंय. तसेच, दोन महिन्यात त्यांनी 40 हजार फॉलोअर्स वाढविण्याची किमया कशी साधली हे देखील सांगितले आहे.
कंप्युटर इंजिनिअरिंग आणि एमबीएचे शिक्षण घेतलेल्या वर्धन कामत यांना अभिनयाची आवड असून, गेल्या 23 वर्षापासून ते नाटक करतायेत.
कामत कौटुंबिक व्यवसाय करतात. त्यांना दोन मुले असून, त्यांच्या रील्सच्या केंद्रस्थानी दोन्ही मुले (आहन - विवान) असतात. मुलांचा निरागसपणा, सहज हावभाव आणि त्यातून निखळ विनोद निर्मिती यावर गोवा, महाराष्ट्रासह देशाविदेशातील लोक भरभरुन प्रेम देतायेत.
मुलांच्या रील्स ना व्ह्यूज मिळायला लागल्यानंतर अचानक फॉलोअर्समध्ये वाढ व्हायला लागली, असे कामत म्हणाले. इन्स्टाग्रामवर अनपेक्षीतपणे खूपच प्रेम मिळाल्याचे ते सांगतात.
कंटेट निवडीबाबत विचारले असता आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीमुळेच विषय मिळतात, असे त्यांनी सांगितले.
मुलगा आहन खूपच हजरजबाबी आहे. कायम काही ना काही प्रश्न विचारत असतो. त्यामुळे कंटेंटच सीड त्याच्या बोलण्यामधून तयार होत. त्यानंतर मी ते स्क्रिप्ट करतो, असेही त्यांनी नमूद केले.
याशिवाय सोसायटी, आपल्या कुटुंबात होणारी चर्चा, शेजारी, दैनंदिन ऍक्टिविटीज, यामुळे कंटेंट मिळत जातो. वेगळा विचार करावा लागत नाही, असेही कामत सांगतात.
वर्धन काम यांनी सांगितल्याप्रमाणे, दोन महिन्यापूर्वी 23 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांचे इंस्टाग्रामवर अंदाजे 1,600 फॉलोअर्स होते. आणि आता ते 42 हजार झालेत.
प्रेक्षकांच्या आवडीनुसार कंटेंट बनवणं मला उचित वाटतं. लोकांची टेस्ट कधीही बदलू शकते, असेही कामत म्हणाले. नव्याने इंस्टाग्रामवर येणाऱ्या किंवा रील्स बनवणाऱ्यांसाठी इतरांची कॉपी न करता, वेगळा विचार करण्याचा सल्ला कामत देतात.
वर्धन कामत यांची सविस्तर मुलाखत वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.