Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

Canada: कॅनडतील टोरंटो येथे खालसा दिन साजरा करण्यात आला, ज्यामध्ये शीख समुदयाचे लोक मोठ्या संख्येने जमले होते.
Canada PM Justine Trudeau
Canada PM Justine TrudeauDainik Gomantak

 India Summons Canadian Diplomat Over 'Khalistan' Slogans At Canada Event: कॅनडतील टोरंटो येथे खालसा दिन साजरा करण्यात आला, ज्यामध्ये शीख समुदयाचे लोक मोठ्या संख्येने जमले होते. या कार्यक्रमात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी त्यांना संबोधित केले. आम्ही तुमच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कठिबद्ध आहोत, असे ते यावेळी म्हणाले. दरम्यान, उपस्थित लोकांनी खलिस्तान समर्थनार्थ घोषणा देण्यास सुरुवात केली.

दरम्यान, पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी संबोधित केलेल्या कार्यक्रमादरम्यान खलिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्याबद्दल भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली. भारत सरकारने कॅनडाच्या उप उच्चायुक्तांना बोलावून त्यांच्याकडे आपला निषेध नोंदवला. याप्रकरणी कॅनडाच्या उप उच्चायुक्तांना समन्स बजावण्यात आले. खालसा दिन उत्सव हा कॅनडातील सर्वात मोठा वार्षिक उत्सव मानला जातो आणि त्यासाठी मोठ्या संख्येने शीख समुदयाचे लोक जमतात.

Canada PM Justine Trudeau
India Canada Tensions: ''आमच्या देशात हस्तक्षेप करुन हत्या घडवून आणली...''; कॅनडाच्या संसदेत भारतविरोधी प्रस्ताव

कॅनडाच्या पंतप्रधानांनी संबोधित केलेल्या कार्यक्रमात 'खलिस्तान' समर्थनार्थ घोषणा दिल्याच्या संदर्भात कॅनडाच्या उप उच्चायुक्तांना आज परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात बोलावण्यात आले, असे परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) ) एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

देशात आठ लाख शीख समुदायाचे लोक आहेत, ज्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. शीख समुदायाच्या हिताचे आम्ही संरक्षण करु, अशी ग्वाही ट्रुडो यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, ''शीख सुमदयातील नागरिकांना घाबरण्याची काही एक गरज नाही. कॅनडाच्या चार्टरमध्ये मूलभूत अधिकार आणि स्वातंत्र्यांची हमी देण्यात आली आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com