Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

India Alliance In Goa: काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आपच्या महिला नेत्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप केला.
India Alliance In Goa
India Alliance In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

India Alliance In Goa

महिलांना सुरक्षित वातावरण देण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत, भाजप त्यांच्या पक्षात गुन्हेगारांचे स्वागत करत आहे, त्यामुळे अशा राजकारण्यांकडून सुरक्षा व न्यायाची अपेक्षा करता येणार नाही, असे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी म्हटले आहे.

इंडिया आघाडीच्या गोव्याच्या प्रवक्त्या मनीषा उसगावकर (काँग्रेस), ॲड आश्मा बी (गोवा फॉरवर्ड) आणि सिसिल रॉड्रिगीस (आप) यांनी काँग्रेस हाऊस येथे संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना, सरकार महिलांचे संरक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला.

सुरक्षेच्या बाबतीत भारत 177 देशांमध्ये 128 व्या क्रमांकावर आहे. आपला देश सुरक्षित आहे का? आपल्याला असुरक्षित राष्ट्र म्हटले जात आहे. गोव्यातही आपण सुरक्षित नाही. महिला आणि बालकांना सुरक्षित वातावरण देण्यात सरकार अपयशी ठरले आहे, सिसिल असे रॉड्रिगिस म्हणाल्या.

सिद्धी नाईक खून प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करण्यात सरकार अपयशी ठरले. पर्वरीत एका मुलीची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेजारच्या राज्यात नेण्यात आला. अलीकडेच पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला, आणि एका 82 वर्षांच्या महिलेची हत्या झाली. हे सर्व पाहिल्यास राज्यात गुन्हेगारी वाढत आहे हे स्पष्ट झाले आहे, असे रॉड्रिगीस म्हणाल्या.

India Alliance In Goa
Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

भाजप पक्षात गुन्हेगारांचे स्वागत करत आहेत. मग अशा पक्षाकडून काय अपेक्षा ठेवता येईल. गोव्यातही बलात्काराचे आरोप असलेले मंत्री आहेत, असे रॉड्रिगीस म्हणाल्या.

गेल्या पाच वर्षांत महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ झालीय. 2019 ते 2023 पर्यंत, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पीडितांवर सुमारे 250 बलात्कार झाले आहेत आणि फक्त 4 आरोपींना शिक्षा झाली आहे. शिक्षेचे प्रमाण इतके कमी आहे ही सरकारसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल आश्मा बी यांनी केला.

गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे, असा आरोप आश्मा यांनी केला.

राज्यात सायबर गुन्हे घडत आहेत, पण सरकार ते थांबवण्यासाठी करण्यासाठी काहीच करत नाही. पोलिसांवर राजकीय दबाव आहे, असा आरोप मनीषा उसगावकर यांनी केला. भाजप महिलांना न्याय देण्यात अपयशी भाजप ठरत आहे, असे उसगावकर म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com