IPL 2023 Prize Money: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धा गेल्या दोन महिन्यापासून सुरू होती. आता आयपीएलच्या या 16 व्या हंगामातील अंतिम सामन्यात प्रवेश करणारे दोन संघ मिळाले आहेत. एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स आणि हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ अंतिम सामना खेळणार आहेत.
अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी होणार आहे. या सामन्याला रविवारी संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल. विशेष गोष्ट अशी की या हंगामातील सर्वात पहिला सामनाही नरेंद्र मोदी स्टेडियमवरच गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघात झाला होता.
दरम्यान, या हंगामात विजेत्या, उपविजेत्या, तसेच पुरस्कार विजेत्या खेळाडूंवर मोठ्या बक्षीस रकमेची बरसात होणार आहे. माध्यमांतील रिपोर्टनुसार आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी एकूण ४६.५ कोटी रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.
यातील विजेत्या संघाला २० कोटी रुपये देण्यात येतील, तसेच उपविजेत्या संघाला १३ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मुंबई इंडियन्सला ७ कोटी रुपये आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाला ६.५ कोटी रुपये मिळणार आहे.
याशिवाय विविध पुरस्कार विजेत्या खेळाडूंनाही मोठी बक्षीस रक्कम मिळणार आहे
विजेता संघ - २० कोटी
उपविजेता संघ - १३ कोटी
तिसरा क्रमांक (मुंबई इंडियन्स) - ७ कोटी
चौथा क्रमांका (लखनऊ सुपर जायंट्स) - ६.५ कोटी
उदयोन्मुख खेळाडू - २० लाख
सुपर स्ट्रायकर - १५ लाख
ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) - १५ लाख
पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स) - १५ लाख
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर - १२ लाथ
सर्वाधिक षटकार - १२ लाख
गेम चेंजर - १२ लाख
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.