Ambati Rayudu Announces Retirement From IPL
Ambati Rayudu Announces Retirement From IPL

IPL 2023: आता यू टर्न नाही, 'या' स्टार खेळाडूने केली निवृत्ती जाहीर; CSK च्या चाहत्यांना मोठा झटका!

Ambati Rayudu Announces Retirement From IPL: आयपीएल 2023 (IPL 2023) च्या फायनल दरम्यान चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.
Published on

Ambati Rayudu Announces Retirement From IPL: आयपीएल 2023 (IPL 2023) च्या फायनल दरम्यान चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या अनुभवी खेळाडूने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

या सीझननंतर हा खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. या खेळाडूने आपल्या फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल चॅम्पियनही बनवले आहे.

या खेळाडूने निवृत्ती जाहीर केली

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज अंबाती रायडूने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. रायडूने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. रायडूने ट्विटमध्ये लिहिले की, 'CSK आणि गुजरात 2 सर्वोत्तम संघ, 204 सामने, 14 हंगाम, 11 प्लेऑफ, 8 फायनल, 5 ट्रॉफी आणि आशा आहे आज 6 वी ट्रॉफी. बराच लांबचा प्रवास झाला.

मी ठरवले आहे की, आज रात्रीचा अंतिम सामना हा माझा आयपीएलमधील (IPL) शेवटचा सामना असेल. मला ही महान स्पर्धा खेळताना खूप आनंद झाला. तुम्हा सर्वांचे आभार. यू-टर्न नाही.'

Ambati Rayudu Announces Retirement From IPL
IPL 2023 Final: फायनलमध्ये चेन्नई - गुजरात संघात होणार बदल? पाहा कशी असून शकतात Playing XI

अंबाती रायुडूची आयपीएल कारकीर्द

अंबाती रायुडूने 2010 मध्ये आयपीएल करिअरला सुरुवात केली. चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त अंबाती रायडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग आहे.

रायुडू 2018 पासून CSK कडून खेळत आहे. अंबाती रायडूने आयपीएलमध्ये आतापर्यंत 203 सामन्यांत 28.29 च्या सरासरीने 4329 धावा केल्या आहेत. रायुडूने आयपीएलमध्ये 22 अर्धशतके आणि 1 शतक झळकावले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com