LSG vs CSK Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: चेन्नईमध्ये दीपक चाहरचे कमबॅक, कृणाल करणार लखनऊची कॅप्टन्सी, पाहा Playing XI

आयपीएल २०२३ स्पर्धेत आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना रंगणार आहे.

Pranali Kodre

Lucknow Super Giants vs Chennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत बुधवारी डबल हेडर म्हणजेच एका दिवशी दोन सामने खेळवण्यात येणार आहे. बुधवारचा पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होत आहे.

या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर दुखापतीतून सावरला असून त्याचे संघात पुनरागमन झाले आहे.

याशिवाय लखनऊचा नियमित कर्णधार केएल राहुल मात्र दुखापतीमुळे हा सामना खेळणार नाही. त्यामुळे कृणाल पंड्या संघाचे नेतृत्व करणार आहे. तसेच लखनऊने या सामन्यासाठी मनन वोहराला आणि करन शर्माला संधी दिली आहे.

चेन्नईने या सामन्यासाठी डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, मथिशा पाथिराना आणि महिश तिक्षणा या चार परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे, तर लखनऊने काईल मेयर्स, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन आणि नवीन-उल-हक या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी प्रत्येकी 4 परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिलेली असल्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूंनाच वापरता येणार आहे.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी राखीव खेळाडूंमध्ये चेन्नईने अंबाती रायुडू, मिचेल सँटेनर, एस सेनापती, शेख राशिद आणि आकाश सिंग यांना संधी दिली आहे, तर लखनऊने क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, डॅनिएल सॅम्स, यश ठाकूर आणि प्रेरक मंकड यांना राखीव खेळाडूंमध्ये संधी दिली आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

  • चेन्नई सुपर किंग्स - ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), दीपक चाहर, मथिशा पाथीराना, तुषार देशपांडे, महिश तिक्षणा

  • लखनऊ सुपर जायंट्स - काईल मेयर्स, मनन वोहरा, करण शर्मा, आयुष बदोनी, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या (कर्णधार), कृष्णप्पा गॉथम, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, मोहसिन खान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT