IPL 2023: इशांत शर्माने खेचून आणला दिल्लीचा विजय! हार्दिकचा गुजरात संघ घरच्या मैदानात पराभूत

आयपीएल २०२३ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सला पराभूत करत हंगामातील तिसरा विजय मिळवला.
Delhi Capitals
Delhi Capitals Dainik Gomantak
Published on
Updated on

Gujarat Titans vs Delhi Capitals: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मंगळवारी गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात 44 वा सामना झाला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 5 धावांनी विजय मिळवला. हा दिल्लीचा या हंगामातील 9 सामन्यांतील तिसरा विजय ठरला, तर गुजरातचा तिसरा पराभव ठरला.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरातसमोर 131 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला 20 षटकात 6 बाद 125 धावाच करता आल्या.

या सामन्यात गुजरातला विजयासाठी अखेरच्या षटकात 12 धावांची गरज होती. यावेळी इशांत शर्मा दिल्लीकडून गोलंदाजीला उतरला, तर गुजरातकडून हार्दिक आणि राहुल तेवातिया फलंदाजी करत होते. पण त्यांना इशांतने पहिल्या तीन चेंडूत 3 धावाच दिल्या आणि चौथ्या चेंडूवर तेवतियाला बादही केले. त्यानंतर अखेरच्या दोन चेंडूत राशीद खानला 3 धावाच करता आल्या. त्यामुळे दिल्लीने हा सामना सहज जिंकला.

Delhi Capitals
तो परत आला...! IPL 2023 मध्ये करत होता कॉमेंट्री, आता थेट RCB कडून खेळणार सामने

या सामन्यात दिल्लीने दिलेल्या 131 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातकडून वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल या दोघांनी सुरुवात केली होती. पण पहिल्याच षटकात खलील अहमदने वृद्धिमान साहाला शुन्यावर बाद केले. तसेच त्याने हे षटकही निर्धाव टाकले. त्यानंतर शुभमन गिल (6), विजय शंकर (6) आणि डेव्हिड मिलरही (0) स्वस्तात बाद झाले.

पण एक बाजू कर्णधार हार्दिक पंड्याने सांभाळलेली होती. त्याला नंतर अभिनव मनोहरने साथ दिली. त्यांच्यात 62 धावांची भागीदारीही झाली. पण असे असले तरी मात्र त्यांना धावगती वाढवता आली नाही. पण त्यांची ही धोकादायक ठरत असलेली भागीदारी खलील अहमदने 18 व्या षटकात अभिनवला 26 धावांवर बाद करत तोडली.

दरम्यान, हार्दिकने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. तसेच त्याला साथ देण्यासाठी आलेला राहुल तेवतिया आक्रमक खेळत होता. त्याने 19 व्या षटकात एन्रिच नॉर्कियाविरुद्ध सलग तीन षटकार ठोकत गुजरातला विजयाच्या जवळ नेले होते. पण अखेरच्या षटकात इशांतने तेवतियाला २० धावांवर माघारी धाडले. तेवतियाने या 20 धावा 7 चेंडूत 3 षटकारांसह केल्या.

तसेच इशांतने अखेरच्या षटकात केवळ 6 धावाच दिल्याने दिल्लीने हा सामना जिंकला. दरम्यान हार्दिक अखेरीस 53 चेंडूत 59 धावा करून नाबाद राहिला. या खेळीत त्याने 7 चौकार मारले.

दिल्लीकडून जवळपास सर्वच गोलंदाजांनी जास्त धावा खर्च न करता चांगली आणि शिस्तबद्ध गोलंदाजी केली. खलील अहमद आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच एन्रिच नॉर्किया आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Delhi Capitals
IPL 2023: बीसीसीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोहली-गंभीरच्या वादावर केली मोठी कारवाई!

तत्पुर्वी, दिल्लीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण डावाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीने फिलिप सॉल्टला माघारी धाडले. त्यानंतर पहिल्या 7 षटकांमध्येच शमीने त्याचा 4 षटकांचा स्पेल पूर्ण केला.

त्याने या चार षटकात दिल्लीला जबरदस्त धक्के दिले. त्याने सॉल्टला बाद केल्यानंतर रिली रोसौ (8), मनिष पांडे (1) आणि प्रियम गर्ग (10) यांना स्वस्तात बाद केले. महत्त्वाचे म्हणजे या तिघांनाही त्याने यष्टीरक्षक वृद्धिमान साहाकडे झेल देण्यास भाग पाडले.

तसेच या दरम्यान कर्णधार डेव्हिड वॉर्नर डावाच्या दुसऱ्या षटकात प्रियम गर्गबरोबर एकेरी धाव घेताना झालेल्या गोंधळात नो-बॉलवर 2 धावा करून धावबाद झाला होता. त्यामुळे दिल्लीची अवस्था 5 बाद 23 धावा अशी झाली होती.

पण नंतर अक्षर पटेल आणि अमन खान यांनी दिल्लीचा डाव सांभाळताना 50 धावांची भागीदारी केली. पण ही भागीदारी मोहित शर्माने अक्षरला 27 धावांवर बाद करत तोडली. पण नंतर अमनने रिपल पटेलला साथीला घेतले. त्याच्याबरोबर भागीदारी करताना अमनने अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर लगेचच त्याला १९ व्या षटकात राशीद खानने बाद केले. अमनने 44 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 51 धावा केल्या.

अखेरच्या षटकात रिपलही 23 धावा करून बाद झाला. पण त्याची आणि अमन यांच्यात झालेली 53 धावांची भागीदारीही महत्त्वाची ठरली. अक्षर, अमन आणि रिपल यांनी दिलेल्या लढाईमुळे दिल्लीला 20 षटकात 8 बाद 130 धावा अशी सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

गुजरातकडून मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी करताना 11 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच मोहित शर्माने 2 विकेट्स घेतल्या आणि राशीद खानने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com