Ishan Kishan | Suryakumar Yadav
Ishan Kishan | Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: ईशान-सुर्याच्या फटकेबाजीला तिलक-डेव्हिडचा फिनिशिंग टच! मुंबईचा पंजाबविरुद्ध दणक्यात विजय

Pranali Kodre

Punjab Kings vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत बुधवारी पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात 46 वा सामना खेळवला गेला. पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने ६ विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी मुंबईसमोर विजयासाठी 215 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा मुंबईने 18.5 षटकात 4 विकेट्स गमावत 216 धावा करत सहज पूर्ण केला. मुंबईचा हा 9 सामन्यांमधील पाचवा विजय ठरला आहे. तसेच पंजाबचा 10 सामन्यांमधील 5 वा पराभव ठरला आहे.

पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. ईशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी मुंबईच्या डावाला सुरुवात केली. पण रोहितला पहिल्याच षटकात ऋषी धवनने शुन्यावर माघारी धाडले. पण त्यानंतर ईशान किशन आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी मुंबईचा डाव सावरताना 54 धावांची भागीदारी केली. मात्र, खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर ग्रीन 6 व्या षटकात 23 धावांवर बाद झाला.

यानंतर मात्र ईशानने आक्रमक खेळण्यास सुरूवात केली. त्याला सूर्यकुमार यादवची योग्य साथ मिळाली. या दोघांनीही दोन्ही बाजूंनी शानदार फटके खेळताना 55 चेंडूतच 116 धावांची भागीदारी केली आणि मुंबईला विजयाच्या दिशेने आग्रेसर केले. या भागीदारीदरम्यान, दोघांनीही अर्धशतके पूर्ण केली.

पण 16 व्या षटकात नॅथन एलिसने मोठा धक्का देत सूर्यकुमारला बाद केले. सूर्यकुमारने 31 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 66 धावांची खेळी केली. तसेच त्याच्या पुढच्याच षटकात ईशानला अर्शदीप सिंगने बाद केले. ईशानने 41 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकार मारले.

हे दोघे बाद झाल्यानंतर टिम डेव्हिड आणि तिलक वर्मा यांनीही आक्रमक पवित्रा घेत 7 चेंडू बाकी ठेवूनच मुंबईला विजय मिळवून दिला. तिलकने 10 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 26 धावा केल्या, तसेच टिमने 10 चेंडूत 3 चौकारांसह 19 धावा केल्या.

पंजाबकडून नॅथन ऍलिसने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या, तसेच ऋषी धवन आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे पंजाब किंग्सकडून प्रभसिमरन सिंग आणि शिखर धवन यांनी डावाची सुरुवात केली. पण प्रभसिमरन दुसऱ्याच षटकात 9 धावा करून अर्शद खानविरुद्ध खेळताना यष्टीरक्षक ईशान किशनकडे झेल देत बाद झाला.

पण त्यानंतर शिखर आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी डाव सावरला. मात्र त्यांची भागीदारी रंगत असतानाच 8 व्या षटकात पीयुष चावलाने शिखरला 30 धावांवर बाद केले. तसेच चावलानेच 12 व्या षटकात 27 धावांवर खेळणाऱ्या मॅथ्यू शॉर्टला बाद केले. यानंतर मात्र लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्माने मुंबईला यश मिळू दिले नाही.

या दोघांनीही आक्रमक खेळ केला. दोघांनीही 119 धावांची नाबाद भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान लिव्हिंगस्टोनने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. त्यामुळे पंजाबला 20 षटकात 3 बाद 214 धावा करता आल्या. लिव्हिंगस्टोनने 42 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 82 धावांची खेळी केली. तसेच जितेशनेही त्याला दमदार साथ देताना 27 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 49 धावांची नाबाद खेळी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Gas Leakage: गॅस बंद न करता झोपी गेले; वास्कोत गुदमरुन वाराणसीच्या एकाचा मृत्यू, तिघे अत्यवस्थ

Netravali: नेत्रावळीत शिकार पार्टीचे नियोजन भोवले; कदंबच्या 16 कर्मचाऱ्यांना काडतूससह रंगेहाथ पकडले

तेलंगणात 2.07 कोटी गोवा बनावटीचे मद्य जप्त; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशात दारु तस्करी

UP Crime: गर्लफ्रेन्डचे गोव्याला जाण्याचे स्वप्न पूर्ण करणं आलं अंगलट; सहा महिने वाचवलेले पैसे पाण्यात

Nuvem Accident : नुवेत कारच्या धडकेने दुचाकीस्‍वाराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT