Shirgao Lairai Jatra: लईराई देवीची जत्रा निर्विघ्न पार पडणार! सुरक्षेसाठी 'स्पेशल टास्क फोर्स'ची स्थापना; सरकारनं कसली कंबर

Special Task Force Shirgao Jatra: गोव्यातील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रेसाठी यंदा प्रशासनाने कंबर कसली आहे.
Special Task Force Shirgao Jatra
Shirgao Lairai JatraDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: गोव्यातील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रेसाठी यंदा प्रशासनाने कंबर कसली आहे. जत्रेचा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा आणि भाविकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी डिचोलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी एका विशेष 'स्पेशल टास्क फोर्स'ची (STF) स्थापना केली आहे. या समितीकडे जत्रेच्या संपूर्ण नियोजनाची आणि सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्याद्वारे विविध सरकारी विभागांमध्ये समन्वय राखला जाणार आहे.

डिचोलीचे (Bicholim) उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेऊन कडक सूचना जारी केल्या आहेत. जत्रेच्या काळात मोठी गर्दी होत असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. या विशेष टास्क फोर्समध्ये डिचोलीचे मामलेदार, पोलीस निरीक्षक, अग्निशमन दलाचे अधिकारी, विद्युत विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते) अधिकारी, इमारती विभागाचे कार्यकारी अभियंता आणि शिरगाव पंचायतीचे सचिव यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती जत्रेपूर्वी आणि जत्रेच्या काळात प्रत्यक्ष मैदानावर उतरुन सर्व सोयीसुविधांची पाहणी करणार आहे.

Special Task Force Shirgao Jatra
Shirgao Lairai Jatra: ''6 मार्चपर्यंत क्राउड मॅनेजमेंट प्लॅन सादर करा'', शिरगाव जत्रेबाबत हायकोर्टाचा कडक आदेश; चेंगराचेंगरी टाळण्यासाठी सरकारला अल्टिमेटम

उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांनी स्पष्ट केले की, रस्त्यांची दुरुस्ती, वीज पुरवठा अखंडित राखणे, पिण्याच्या पाण्याची सोय आणि अग्निशमन दलाची तैनातता यावर विशेष भर दिला जाईल. विशेषतः जत्रेतील अग्नीकुंड आणि त्याभोवती होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता, सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आवश्यक पावले उचलण्याचे आदेश पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस दलाचा विशेष आराखडा तयार असेल, तर आरोग्य विभागाकडूनही आपत्कालीन वैद्यकीय मदतीची तयारी ठेवली जाणार आहे.

Special Task Force Shirgao Jatra
Shirgao Lairai Jatra: कडक पोलिस बंदोबस्तात पार पडला श्री लईराई देवीचा कौलोत्सव

या उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारची हालगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असे प्रशासनाने बजावले आहे. जत्रेच्या भव्यतेमुळे शिरगाव पंचायतीने देखील स्थानिक स्तरावर स्वच्छतेचे आणि नियोजनाचे काम हाती घेतले आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि उत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी हा 'स्पेशल टास्क फोर्स' अहोरात्र कार्यरत राहणार आहे. यामुळे यंदाची लईराई जत्रा अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com