Dhoni on Retirement: 'तुम्हीच ठरवलंय...', धोनी अखेरच्या IPL बद्दल 'ते' वाक्य बोललाच; चाहत्यांचाही आनंद गगनात मावेना

Video: लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध टॉस जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने अखेरच्या आयपीएल हंगामाबाबत मोठे भाष्य केले.
MS Dhoni
MS DhoniDainik Gomantak
Published on
Updated on

MS Dhoni on his Last IPL: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत बुधवारी 45 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होत आहे. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यावेळी त्याने एक महत्त्वाचे विधान करत चाहत्यांना आनंद दिला आहे.

खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून हा धोनीचा अखेरचा हंगाम असल्याची चर्चा आहे. त्याचमुळे सध्या त्याला प्रत्येक मैदानात प्रेक्षकांकडून आणि मैदानाबाहेरील चाहत्यांकडून मोठा पाठिंबा मिळतानाही दिसत आहे. या प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे धोनीने मध्यंतरी आभार मानताना केलेल्या विधानांवरून त्याच्या अखेरचा हंगाम असल्याच्या चर्चेने अधिक जोर पकडला होता.

MS Dhoni
MS Dhoni: जेव्हा कॅप्टनकूल भडकतो...! CSK च्या युवा खेळाडूला भर सामन्यात धोनीने सुनावलं

पण अशातच धोनीने बुधवारी लखनऊविरुद्ध नाणेफेक जिंकल्यानंतर त्याच्या अखेरच्या आयपीएल हंगामाबाबत मोठे भाष्य केले. नाणेफेकीवेळी प्रेझेंटेटर डॅनी मॉरिसन यांनी त्याला प्रेक्षक ज्याप्रकारे त्याच्या शेवटच्या हंगामासाठी त्याला पाठिंबा देण्यासाठी येत आहे, त्याची तो मजा घेतोय का, अशा अर्थाचा प्रश्न विचारला.

त्यावर धोनी म्हणाला, 'तुम्हीच हा माझा शेवटचा आयपीएल हंगाम असल्याचे ठरवले आहे, मी नाही.' यानंतर तो हसला. त्यानंतर मॉरिसन यांनी तो परत येणार आहे, असं प्रेक्षकांना सांगितले.

दरम्यान, धोनीने आता हे विधान केल्याने त्याने तो पुढील हंगामातही दिसणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्याच्या अनेक चाहत्यांना आनंद झाला आहे. त्यांनी सोशल मीडियावर कमेंट्स करत त्यांचा आनंद व्यक्तही केला आहे.

MS Dhoni
MS Dhoni: जयपूर का आहे हृदयाच्या खूप जवळ? खुद्द कॅप्टनकूलनेच केला खुलासा

पण आता धोनीचा अखेरच्या आयपीएलबाबात अंतिम निर्णय नक्की काय असणार आहे, हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.

दरम्यान, बुधवारी होणाऱ्या सामन्यात चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर दुखापतीतून सावरला असून त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याला आकाश सिंग ऐवजी संघात संधी मिळाली आहे.

चेन्नईच्या या हंगामातील आत्तापर्यंतच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाल्यास त्यांचा हा १० वा सामना असून त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये ५ सामने जिंकले आहेत आणि ४ सामने पराभूत झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com