Sachin Tendulkar Birthday Dainik Gomantak
क्रीडा

Sachin Tendulkar: दोन दिवसआधीच मास्टर-ब्लास्टरचा वानखेडेवर 50वा वाढदिवस दणक्यात साजरा, पाहा Video

Video: शनिवारी सचिन तेंडुलकरचा 50 वा वाढदिवस वानखेडे स्टेडियमवर साजरा करण्यात आला.

Pranali Kodre

Sachin Tendulkar 50th Birthday: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 50 वा वाढदिवस सोमवारी (24 एप्रिल) आहे. पण असे असले तरी त्याचा हा वाढदिवस दोन दिवस आधीच वानखेडे स्टेडियमवर शनिवारी (22 एप्रिल) साजरा करण्यात आला.

शनिवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना झाला. या सामन्याच्या सुरुवातीलाच दुसऱ्या स्ट्रॅटर्जिक टाईमआऊट दरम्यान सचिनचा 50 वाढदिवस साजरा करण्यात आला.

सचिनने मुंबई इंडियन्सच्या डगआऊटजवळ त्याच्या वाढदिवसाचा केक कापला. यावेळी सचिन म्हणाला, ही त्याची सर्वात धीम्यागतीचे अर्धशतक आहे. सचिन केक कापत असताना मुंबई इंडियन्सचे खेळाडूही त्याच्या आजुबाजूला होते.

मुंबई इंडियन्सने केले सेलिब्रेशन

मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने सचिनचा हा वाढदिवस साजरा करण्याची व्यवस्था केली होती. सचिन मुंबई इंडियन्सचा आयकॉन असून तो 2008 ते 2013 या दरम्यान मुंबई इंडियन्सकडून क्रिकेट खेळला आहे. तसेच त्याने काही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्वही केले आहे.

शनिवारी सामना पाहायला आलेल्या वानखेडे स्टेडियमवरील 30 हजारांपेक्षा अधिक चाहत्यांना सचिनच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी त्याच्या चेहऱ्याचे मास्कही पुरवण्यात आले होते. तसेच सचिनने त्याच्या कारकिर्दीत 10 क्रमांकाची जर्सी वापरली.

त्यामुळे गरवारे पॅव्हेलियनच्या बाहेर त्याच्या 10 क्रमांकाच्या जर्सीचा मोठा रिप्लिकाही ठेवण्यात आला आहे, जेणेकरून तिथे चाहते फोटोही काढू शकतात. दरम्यान, स्टेडियममध्ये सचिन..सचिन असा जयघोषही यावेळी झालेला पहायला मिळाला.

याबद्दल मुंबई इंडियन्सने प्रसिद्धी पत्रकात माहिती दिली की 'सचिनने 10 क्रमांकाची जर्सी क्रिकेटमध्ये आयकॉनिक बनवली आणि यावर्षी त्याने भारतासाठी अखेरचा सामना खेळला, त्याला 10 वर्षे पूर्ण होतील. हा सामना त्याने वानखेडे स्टेडियमवर खेळला होता. याचनिमित्ताने सर्वाधिक धावा करणारा आणि भारताचा सर्वाधिक कसोटी आणि वनडे सामना खेळणाऱ्या खेळाडूच्या गौरवशाली कारकिर्दीचे सेलिब्रेशन शनिवारी केले जाणार आहे.'

दरम्यान, सचिनच्या या वाढदिवासाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे वानखेडे हे सचिनचे घरचे मैदान आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT