Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरचा बंगला होणार 5 मजल्यांचा, CRZ कडून बांधकामास मंजुरी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला वांद्रे येथील बंगल्याचे मजले वाढविण्यासाठी महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने परवानगी दिली आहे.
Sachin Tendulkar
Sachin TendulkarDainik Gomantak
Published on
Updated on

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला वांद्रे येथील बंगल्याचे मजले वाढविण्यासाठी महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडुन परवानगी मिळाली आहे. त्यामुळे पाच मजल्यांपर्यंत बांधकाम वाढविण्याचे तेंडुलकरचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 

वांद्रे पश्चिममधील पेरी क्रॉस रोडवर तेंडुलकर यांनी बंगला बांधला आहे. पण ही जागा सीआरझेड-2 मध्ये येत असल्याने एफएसआय केवळ एकचा मिळाला. त्यानुसार सचिनने साडे तीन मजल्यांचा बंगला उभारला होता.

दरम्यान, 2019 मध्ये नियमात बदल होऊन 0.5  इतका वाढीव एफएसआय देण्यात आला. त्या आधारे तेंडुलकर व पत्नी डॉ. अंजली यांनी महापालिका आणि सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अर्ज केला होता. त्याला आता मंजुरी मिळाली आहे. 

जया बच्चन यांच्या विलेपार्ले येथील कपोई हाउसिंग सोसायटीत असलेल्या बंगल्यात वाढीव बांधकाम करण्यास मंजुरी दिली आहे. तसेच प्रख्यात उद्योगपती गौतम अदानी यांचे व्याही सिरिल श्रॉफ यांच्या वरळी सीफेसवरील बंगल्याच्या वाढीव बांधकामासही मंजुरी दिली आहे. 
श्रॉफ हे आघाडीचे वकील आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com