IPL 2023: स्टोक्स कधी करणार कमबॅक? CSK कोचकडून महत्त्वाचे अपडेट्स, धोनीच्या दुखापतीबद्दलही सांगितले

सीएसकेचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी बेन स्टोक्स आणि एमएस धोनी यांच्या दुखापतीबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
 Stephen Fleming and MS Dhoni
Stephen Fleming and MS DhoniDainik Gomantak
Published on
Updated on

CSK coach Stephen Fleming gave updates on Ben Stokes and MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमयर लीग 2023 हंगामात आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पण असे असले तरी सीएसकेला त्यांच्या काही खेळाडूंच्या दुखापतीची चिंता आहे. याबद्दल शुक्रवारी (21 एप्रिल) सनरायझर्स हैदराबादला 7 विकेट्सने पराभूत केल्यानंतर सीएसकेच्या प्रशिक्षकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी हा देखील सध्या गुडघ्याच्या दुखापतीचा सामना करत असल्याचे फ्लेमिंग यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. याबद्दलही शुक्रवारी झालेल्या सामन्यानंतर फ्लेमिंग यांनी माहिती दिली आहे.

तसेच सीएसकेने 16 कोटींहून अधिकची किंमत मोजत संघात घेतलेल्या बेन स्टोक्सही अद्याप पूर्ण फिट झालेला नसल्याचे फ्लेमिंग यांनी स्पष्ट केले.

 Stephen Fleming and MS Dhoni
MS Dhoni: 'माझा शेवटचा...', कॅप्टनकूलने दिले रिटायमेंटचे संकेत, पाहा नक्की काय म्हणाला धोनी

फ्लेमिंग म्हणाले, 'बेन स्टोक्सला दुखापतीचा फटका बसला आहे आणि तो अद्याप एक आठवडा खेळू शकणार नाही. त्याला फक्त सध्या दुखापीतीचा त्रास होत आहे. मी त्यात खूप खोलवर जाणार नाही, पण त्याची दुखापत खूप गंभीर नाही. तो लवकरच परत येईल. तो फिट होण्यासाठी मेहनत घेत आहे. त्यात काही चूक नाही. त्याला थोडी नशीबाचीही साथ हवी.'

तसेच फ्लेमिंग यांनी सांगितले की 'धोनी बरा आहे. तो त्याच्या दुखापतीला चांगल्या प्रकारे सांभाळत आहे. तो अविश्वसनीय आहे. त्याने नेहमीच संघाला प्राधान्य दिले आहे. जर त्याला माहिती असते की तो दुखापतीमुळे संघासाठी योगदान देऊ शकत नाही, तर त्याने स्वत:ला संघातून बाहेर केले असते. त्याच्याबद्द काहीही काळजी नाही.'

याशिवाय धोनीने हैदराबादविरुद्ध एक झेल, एक यष्टीचीत आणि एक धावबाद अशी यष्टीमागे शानदार कामगिरीही केली. याबद्दल बोलताना फ्लेमिंग यांनी सांगितले की 'त्याच्याकडे नैसर्गिक कौशल्य आहे. मला वाटत नाही की त्याला त्याच्या यष्टीरक्षणासाठी फारसे श्रेय मिळते. खरं सांगायचं तर तो खरंच एक कारागीर आहे. स्टंपच्या मागे तो परिपूर्ण आहे आणि अनेकदा तो करत असलेल्या सर्व गोष्टींकडे पाहून त्याच्या यष्टीरक्षणाकडे लक्ष दिले जात नाही.'

 Stephen Fleming and MS Dhoni
MS Dhoni: 'तरीही मला तो पुरस्कार देत नाहीत...', धोनीनं बोलून दाखवली मनातली खंत

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की सध्या बेन स्टोक्स व्यतिरिक्त सिसांडा मगला आणि दीपक चाहर हे सीएसकेचे खेळाडू देखील दुखापतीमुळे काही काळासाठी बाहेर आहेत.

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 134 धावा केल्या होत्या. हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 34 धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त कोणालाही 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. सीएसकेकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

तसेच 135 धावांच्या आव्हानाचा पाठलाग सीएसकेने 18.4 षटकात 3 विकेट्स गमावत 138 धावा करत सहज पूर्ण केला. सीएसकेकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 77 धावांची नाबाद खेळी केली. तसेच ऋतुराज गायकवाडने 35 धावांची खेळी केली. हैदराबाजकडून मयंक मार्केंडेने 2 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com