Chennai Super Kings Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: आज लखनऊविरुद्ध CSK चा महामुकाबला, या खतरनाक Playing 11 सह...

IPL 2023 आज मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात सामना खेळला जाणार आहे.

Manish Jadhav

IPL 2023 आज मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात सामना खेळला जाणार आहे. विजयाच्या मार्गावर येण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जला हा सामना कोणत्याही परिस्थीतीत जिंकावा लागेल.

चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्या पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध 5 विकेटने पराभव स्वीकारावा लागला होता, तर लखनऊ सुपर जायंट्सने त्यांच्या पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससारख्या बलाढ्य संघाचा 50 धावांनी पराभव केला होता.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा संघ आज संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सामना खेळणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज 3 वर्षांनंतर चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळणार आहे, जिथे त्याला हरवणे खूप कठीण आहे. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या आजच्या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असणार आहे ते पाहूया...

सलामीवीर

डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड आजच्या आयपीएल सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जकडून सलामी देतील.

डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड ही जोडी अत्यंत धोकादायक आहे. हे दोन्ही फलंदाज पॉवर-प्लेमध्ये जबरदस्त फटकेबाजी करण्यात माहिर आहेत.

डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड हे क्षणार्धात सामन्याचं रंग रुप पालटण्यातही माहिर आहेत. ऋतुराज गायकवाडने गुजरात टायटन्सविरुद्धच्या (Gujarat Titans) शेवटच्या सामन्यात 50 चेंडूत 92 धावांची विस्फोटक खेळी खेळली होती.

मीडल ऑर्डर

चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोईन अली (Moeen Ali) तिसऱ्या क्रमांकावर उतरेल. इंग्लंडचा घातक अष्टपैलू बेन स्टोक्स चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल.

चेन्नई सुपर किंग्ज संघ व्यवस्थापन अंबाती रायडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरवणार आहे.

सातवा क्रमांक आणि यष्टिरक्षक

भारताचा विस्फोटक अष्टपैलू शिवम दुबे चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सहाव्या क्रमांकावर उतरेल. कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी 7 व्या क्रमांकावर उतरेल, जो चेंडू आणि बॅटने सामन्याचा रंग बदलण्यात माहिर आहे.

फिरकी गोलंदाजी डिपार्टमेंट

चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रवींद्र जडेजा फिरकी डिपार्टमेंटचे नेतृत्व करेल आणि मिचेल सँटनर त्याला साथ देईल.

वेगवान गोलंदाजी डिपार्टमेंट

चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वेगवान गोलंदाजांमध्ये सिमरनजीत सिंग आणि दीपक चहरला संधी दिली जाऊ शकते.

ही चेन्नई सुपर किंग्जची प्लेइंग इलेव्हन असू शकते

डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, शिवम दुबे, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, सिमरनजीत सिंग, दीपक चहर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT