IPL 2023, LSG vs DC: घरच्या मैदानावर लखनऊचा विजय! मेयर्स-वूडचं तुफान दिल्लीला पडलं भारी

शनिवारी आयपीएल 2023 च्या तिसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा धक्का दिला आहे.
Lucknow Super Giants
Lucknow Super GiantsDainik Gomantak
Published on
Updated on

Lucknow Super Giants vs Delhi Capitals: शनिवारी (1 एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील तिसरा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. लखनऊने घरच्या मैदानात झालेल्या या सामन्यात 50 धावांनी विजय मिळवला. यासह त्यांनी या हंगामात आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली आहे.

या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 194 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला 20 षटकात 9 बाद 143 धावांच करता आल्या. त्यामुळे दिल्लीला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

Lucknow Super Giants
IPL 2023 Video: सिक्स रोखण्याचा प्रयत्न विलियम्सनला महागला? पहिल्या विजयानंतरही गुजरातला मोठा धक्का

या सामन्यात 194 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी चांगली सुरुवात केली होती. पण सलामीला 41 धावांची भागीदारी झाली असतानाच शॉला मार्क वूडने त्रिफळाचीत केले. त्यापुढच्याच चेंडूवर लयीत असलेल्या मिचेश मार्शलाही वूडने माघारी धाडत दिल्लीला दुहेरी धक्के दिले.

या धक्क्यातून सावरणे दिल्लीला कठीण गेले. कारण यानंतर धावगती वाढत गेल्याने दिल्लीसाठी विजयाचा मार्ग कठीत होत गेला. सर्फराज खानलाही वूडनेच 4 धावांवर माघारी धाडले. दरम्यान, वॉर्नरला रिली रोसौने साथ देण्याचा प्रयत्न केला. पण रोसौपण 30 धावा करून बाद झाला.

एकीकडे विकेट जात असताना वॉर्नरने दुसरी बाजू सांभाळली होती. त्याने अर्धशतकही पूर्ण केले. पण तरी त्याला फार मोठे फटके खेळण्यापासून लखनऊने रोखले होते. यादरम्यान दिल्लीने रोवमन पॉवेल (१) आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या अमन खान (4) यांचीही विकेट स्वस्तात गमावली. त्यानंतर आवेश खानने वॉर्नरचाही अडथळा दूर केला.

वॉर्नर 48 चेंडूत 7 चौकारांसह 56 धावा करून बाद झाला. त्यानंतर मात्र दिल्लीपासून विजय बराच दूर गेला. अक्षर पटेल (16) आणि चेतन साकारिया अखेरच्या षटकात वूडने बाद केले. अखेर दिल्ली 20 षटकात 143 धावाच करू शकले.

लखनऊकडून मार्क वूडने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच आवेश खान आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

Lucknow Super Giants
IPL 2023: पहिला सामना सुरु असतानाच KKR ला धक्का! 'हे' परदेशी खेळाडू लगेच होणार नाही टीममध्ये सामील

तत्पूर्वी लखनऊने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 193 धावा केल्या होत्या. लखनऊकडून कर्णधार केएल राहुल आणि काईल मेयर्स यांनी डावाची सुरुवात केली. पण केएल राहुल 8 धावांवर बाद झाला. पण काईल मेयर्सने आक्रमक खेळ करत अर्धशतक पूर्ण केले. त्याला दुसऱ्या बाजूने दीपक हुडाने चांगली साथ दिली. या दोघांमध्ये 79 धावांची भागीदारीही झाली.

पण ही भागीदारी 11 व्या षटकात कुलदीप यादवने दीपकला 17 धावांवर बाद करत तोडली. त्याच्याच पुढच्या षटकाच मेयर्सही अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. मेयर्सने 38 चेंडूत 73 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 7 षटकार मारले.

त्यानंतर मार्कस स्टॉयनिसही 12 धावा करून बाद झाला. तर निकोलस पूरनने 21 चेंडूत 36 धावांची खेळी केली. याशिवाय आयुष बडोनीने आक्रमक फडके मारताना 7 चेंडूत 18 धावांची खेळी केली. अखेर कृणाल पंड्या 13 चेंडूत 15 धावांवर नाबाद राहिला. तसेच इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेला कृष्णप्पा गॉथमने अखेरच्या चेंडूवर फलंदाजीला येत षटकार मारला आणि लखनऊला 193 धावांपर्यंत पोहोचवले.

दिल्लीकडून खलील अहमद आणि चेतन साकारिया यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com