Marcus Stoinis
Marcus Stoinis Dainik Gomantak
क्रीडा

IPL Video Viral: 6,6,6,6,6... स्टॉयनिस-पूरनचा कहर, एकाच ओव्हरमध्ये 31 धावा चोपत फिरवली मॅच

Pranali Kodre

Marcus Stoinis and Nicholas Pooran combined hit 31 runs: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात 58 वा सामना पार पडला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनऊने अखेरच्या षटकात 7 विकेट्सने विजय मिळवला.

लखनऊच्या या विजयात अर्धशतकी खेळी करणाऱ्या प्रेरक मंकड व्यतिरिक्त मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरन यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. या दोघांनी 16 व्या षटकात चोपलेले 5 षटकार या सामन्याचे पारडे पालण्यासाठी महत्त्वाचे ठरले.

झाले असे की या सामन्यात हैदराबादने लखनऊसमोर विजयासाठी 183 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या गोलंदाजांनी लखनऊच्या फलंदाजांवर चांगले नियंत्रण ठेवले होते. हैदराबादला अखेरच्या 30 चेंडूत 69 धावांची गरज होती.

यावेळी हैदराबादकडून 16 वे षटक टाकण्यासाठी अभिषेक शर्मा गोलंदाजीला आला. तसेच यावेळी स्टॉयनिस स्ट्राईकवर होता, तर नॉन-स्ट्रायकरवर प्रेरक मंकड होता.

यावेळी अभिषेकने टाकलेल्या पहिल्या तिन्ही चेंडूंवर स्टॉयनिसने षटकार ठोकले. यातील दुसरा चेंडू अभिषेकला परत टाकायला लागला होता, कारण तो वाईड पडला होता. त्यामुळे पहिल्या तीन चेंडूतच 19 धावा निघाल्या होत्या.

पण अभिषेकने चौथ्या चेंडूवर लयीत असलेल्या स्टॉयनिसला अब्दुल सामदच्या हातून झेलबाद केले. स्टॉयनिस 25 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. पण तो बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या निकोलस पूरनने लगेचच आक्रमण केले. त्याने अभिषेकने टाकलेल्या 16 व्या षटकाच्या अखेरच्या दोन्ही चेंडूंवर खणखणीत षटकार मारले. त्यामुळे या षटकात तब्बल 31 धावा निघाल्या.

त्यामुळे लखनऊ समोरील विजयासाठीचे समीकरणही बदलले. या षटकानंतर लखनऊला २४ चेंडूत 38 धावांची गरज विजयासाठी उरली होती. नंतर पूरनने प्रेरक मंकडसह हे आव्हान सहज लखनऊला पूर्ण करून दिले.

पूरन 13 चेंडूत 44 धावा करून नाबाद राहिला, तर प्रेरकने 45 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे लखनऊने 183 धावांचे आव्हान 19.2 षटकात 3 विकेट्स गमावत सहज पूर्ण केले.

तत्पुर्वी हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 182 धावा केल्या होत्या. हैदराबादकडून हेन्रक क्लासेनने सर्वाधिक 47 धावा केल्या. तसेच हैदराबादकडून अनमोलप्रीत सिंग आणि अब्दुल सामद यांनीही चांगल्या खेळी केल्या. अनमोलप्रीतने 36 धावांची खेळी केली, तसेच अब्दुल सामदने नाबाद 37 धावांची खेळी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT