IPL 2023 Playoff equation: गुजरात-चेन्नईचे स्थान पक्के? मुंबई साठी समीकरण कसे असेल वाचा सविस्तर

मुंबई इंडियन्सने शुक्रवारी गुजरात टायटन्सविरुद्ध 27 धावांनी विजय मिळवल्यानंतर प्लेऑफची समीकरणेही बदलली आहेत.
Gujarat Titans and Mumbai Indians
Gujarat Titans and Mumbai IndiansDainik Gomantak

IPL 2023 Playoff Qualification Equation: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आहे. आत्तापर्यंत 57 सामने खेळून झाले असून साखळी फेरीतील आता फक्त 13 सामने उरले आहेत. त्यानंतर प्लेऑफसाठी प्रवेश करणाऱ्या चार संघांचे चित्र स्पष्ट होणार आहे. पण आता प्लेऑफच्या दृष्टीने अनेक समीकरणे तयार झाली आहेत.

सध्या 57 सामन्यांनंतरची गुणतालिका पाहिली तर गुजरात जायंट्स आघाडीवर असून त्यांनी 12 सामन्यांमधील 8 सामने जिंकून 16 गुण मिळवले आहेत. त्यापाठोपाठ चेन्नई सुपर किंग्स संघ आहे. त्यांनी 12 सामन्यांतील 7 सामने जिंकले आहेत, तसेच एक सामना रद्द झाला होता. त्यामुळे त्यांचे 15 गुण आहे.

मुंबईच्या विजयानंतर गुणतालिकेत बदल

त्याचबरोबर शुक्रवारी मुंबई इंडियन्सने गुजरातला 27 धावांनी पराभूत केल्याने गुणतालिकेत अनेक बदल झालेले दिसले आहेत. या विजयामुळे मुंबईने गुणतालिकेत तिसरा क्रमांक मिळवला आहे. मुंबईने 12 सामन्यांतील 7 सामने जिंकले आहेत. त्यामुळे 14 गुणांसह ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Gujarat Titans and Mumbai Indians
Rahul Dravid चा रिपाॅर्ट कार्ड : ICC ट्रॉफी आणि टीम इंडियाच्या मधली 'वॉल' प्रशिक्षक तोडणार का?

त्यापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स आहेत. त्यांनी 12 सामन्यांतील 6 सामने जिंकले आहेत. त्याचे 12 गुण आहेत. त्याचबरोबर पाचव्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाचे 11 गुण आहेत. त्यांनी 11 सामन्यांमधील 5 सामने जिंकले आहेत, तर 1 सामना रद्द झाला आहे.

त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स हे तीन संघ आहेत. या तिन्ही संघांचे गुण 10 आहेत. पण यातील बेंगलोर आणि पंजाब या संघांनी आत्तापर्यंत 11 सामने खेळले आहेत, तर कोलकाताने 12 सामने खेळले आहेत.

अखेरच्या दोन क्रमांकावर सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स आहेत. हैदराबादने 10 सामन्यांत 4 सामने जिंकून 8 गुण मिळवले आहेत. तसेच दिल्लीने 12 सामन्यांतील ४ सामने जिंकले असून त्यांचेही 8 गुण आहेत.

IPL 2023 Points Table after 57 matches
IPL 2023 Points Table after 57 matcheswww.iplt20.com

प्लेऑफसाठी समीकरणे

आता ही गुणतालिका पाहिली, तर गुजरात आणि चेन्नईचे प्लेऑफचे तिकीट जवळपास पक्के आहे. या दोन्ही संघांना त्यांच्या उर्वरित दोन सामन्यांपैकी एक सामना जरी जिंकला, तरी प्लेऑफचे तिकीट सहज मिळणार आहे. दरम्यान, गुजरातने उर्वरित दोन्ही सामने पराभूत झाले, तरी त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळू शकते. पण चेन्नईला मात्र, एक विजय आवश्यकच असणार आहे.

पण यानंतर आयपीएल प्लेऑफमधील उर्वरित दोन जागांसाठी मोठी चूरस आहे. तसेच कोलकाता आणि दिल्ली या संघांचे गणितीय समीकरणांनुसार अद्याप आव्हान संपले नसले, तरी त्यांची प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता खूपच कमी आहे.

आशात मुंबई, बेंगलोर, राजस्थान, लखनऊ, पंजाब आणि हैदराबाद या संघांमध्ये मोठी चूरस आहे. पण मुंबई आणि लखनऊसाठी हा मार्ग जास्त सुकर आहे. कारण अन्य तीन संघ जास्तीत जास्त 16 गुणांपर्यंत पोहचू शकतात, तर मुंबई 18 गुणांपर्यंत आणि लखनऊ 17 गुणांपर्यंत पोहचू शकतात. मात्र असे होण्यासाठी या संघांना त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे.

तसेच लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की मुंबई आणि लखनऊला एकमेकांविरुद्ध अद्याप एक सामना खेळायचा आहे. त्यामुळे आता या दोन्ही संघांपैकी एका संघाच्या प्लेऑफच्या आशेला धक्का बसणार हे स्पष्ट आहे.

या दोन संघांच्या प्लेऑफच्या संधीबद्दल सांगायचे झाल्यास मुंबईने उर्वरित दोन्ही सामने जिंकले, तर ते सहज प्लेऑफमध्ये पोहचणार आहेत. पण त्यांना एक जरी पराभव स्विकारावा लागला, तर अन्य संघांच्या निकालावर आणि नेट रन रेटवरही लक्ष ठेवावे लागणार आहे.

Gujarat Titans and Mumbai Indians
IPL Viral Video: विषय हार्ड! पठ्ठ्यानं स्टेडियममध्ये जाऊनही मॅच पाहिली मोबाईलवरच, तेही आरामात झोपून

याशिवाय लखनऊला उर्वरित तिन्ही सामन्यात विजय मिळवणे गरजेचेच आहे. जर त्यांना एकाही सामन्यात पराभूत व्हावे लागले, तरी त्यांना अन्य संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

तसेच राजस्थान, पंजाब, बेंगलोर आणि हैदराबाद यांना प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकणे गरजेचेच आहे. त्याचबरोबर या संघांना त्यांचा नेट रनरेटही सुधारावा लागणार आहे.

यातील केवळ राजस्थानसाठी नेट रनरेटची बाब सकारात्मक आहे. त्यांचा नेट रनरेट पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे अखेरीस त्यांच्यासाठी हा नेट रनरेट महत्त्वाचा ठरू शकतो. त्याचमुळे या चारही संघांना आता आपापले सामने जिंकण्यावर आणि अन्य संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com