IPL Viral Video: विषय हार्ड! पठ्ठ्यानं स्टेडियममध्ये जाऊनही मॅच पाहिली मोबाईलवरच, तेही आरामात झोपून

एक तरुण स्टेडियममध्ये जाऊन मोबाईलवर IPL मॅच पाहात असतानाचा एक व्हिडिओ सध्या धुमाकूळ घालत आहे.
A man watching an IPL match on a mobile phone in Stadium
A man watching an IPL match on a mobile phone in StadiumDainik Gomantak

A man watching an IPL match on a mobile phone in the Stadium: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे आता सर्व संघातच प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी चूरस पाहायला मिळत आहे. 56 सामन्यानंतरही अद्याप कोणत्याच संघाने प्लेऑफमध्ये जागा पक्की करता आलेली नाहीये. त्यामुळे सामने रोमांचक होतानाही दिसताहेत.

अशातच यंदा जवळपास चार वर्षांनंतर स्टेडियमही चाहत्यांनी पूर्ण भरलेले दिसत आहेत. गेल्या तीन वर्षात कोरोनामुळे चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन सामन्यांचा मनसोक्त आनंद घेता आला नव्हता. पण आता यानंतर यावर्षी चाहते मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये उपस्थित राहात आहेत. असे असतानाही एका तरुणाने कहर केला आहे.

A man watching an IPL match on a mobile phone in Stadium
IPL 2023: रिंकू सिंह लवकरच टीम इंडियासाठी खेळणार, 'या' दिग्गजाने केली भविष्यवाणी!

सध्या आयपीएलमधील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की एक तरुण आयपीएलचा सामना पाहाण्यासाठी स्टेडियममध्ये गेला आहे. पण हा तरूण मात्र मागे रिकाम्या खुर्च्यांवर आरामात झोपून मोबाईलवर सामना पाहत आहे.

त्यामुळे सध्या या व्हिडिओवर अनेक गमतीशीर प्रतिक्रियाही येत आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ कोणत्या सामन्यातील किंवा कधीचा आहे, याबद्दल स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पण व्हिडिओमधून हे स्टेडियम लखनऊमधील असल्याचे समजत आहे.

तसेच काहींनी अंदाज व्यक्त केला आहे की हा व्हिडिओ डाव सुरु होण्याच्या किंवा ब्रेक टाईममधील असल्याची शक्यता आहे आणि तो तरुण कदाचीत हायलाईट पाहात असावा. पण असे असले तरी मात्र, सध्या हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे.

A man watching an IPL match on a mobile phone in Stadium
IPL 2023: धोनीच्या 'या' व्हिडिओचा सोशल मीडियावर धूमाकूळ, दीपक चहरशी...; पाहा Video

आयपीएल 2023 मध्ये चूरस

दरम्यान आयपीएल 2023 स्पर्धेत अद्याप 14 साखळी सामने उरले आहेत. साखळी फेरी 21 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर प्लेऑफमध्ये प्रवेश करणारे चार अंतिम संघ मिळतील. प्लेऑफचे सामने 23 ते 28 मे दरम्यान खेळवले जाणार आहेत.

आयपीएल 2023 प्लेऑफमध्ये 23 मे रोजी पहिला क्वालिफायर सामना, 24 मे रोजी एलिमिनेटर आणि 26 मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर 28 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटर चेन्नईमध्ये होणार आहे. तसेच दुसरा क्वालिफायर आणि अंतिम सामना अहमदाबादला खेळवला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com