Lucknow Super Giants Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: लखनऊचा हैदराबादवर दणदणीत विजय! कृणाल पंड्याची 'ऑलराऊंड' कामगिरी ठरली मोलाची

LSG vs SRH: सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या विजयात लखनऊ सुपर जायंट्ससाठी कृणाल पंड्याची अष्टपैलू कामगिरी महत्त्वाची ठरली.

Pranali Kodre

Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत दहावा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात शुक्रवारी पार पडला. या सामन्यात लखनऊने 5 विकेट्सने जिंकला. हा त्यांचा या हंगामातील दुसरा विजय ठरला.

लखनऊच्या घरच्या मैदानावर भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर झाला. या सामन्यात हैदराबादने लखनऊसमोर विजयासाठी 122 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग लखनऊने 16 षटकात 5 बाद 127 धावा करत पूर्ण केले. लखनऊच्या विजयात कृणाल पंड्याने अष्टपैलू कामगिरी करत महत्त्वाचा वाटा उचलला.

या सामन्यात 122 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊकडून केएल राहुल आणि काईल मेयर्स यांनी चांगली सुरुवात केली होती. पण काईल मेयर्सला पाचव्या षटकात फझलहक फारुकीने 15 धावांवर बाद केले. त्यानंतर 6 व्या षटकात दीपक हुडाला 7 धावांवर भुवनेश्वर कुमारने बाद केले.

पण यानंतर कर्णधार केएल राहुलला कृणाल पंड्याने चांगली साथ दिली. या दोघांनी 55 धावांची भागीदारी केली. पण त्यांची भागीदारी उमरान मलिकने पंड्याला बाद करत मोडली. पंड्याने 23 चेंडूत 34 धावांची खेळी केली.

पंड्या बाद झाला तेव्हा लखनऊ विजयाच्या जवळ पोहचले होते. मात्र आदिल राशीदने 15 व्या षटकात लागोपाठच्या चेंडूवर केएल राहुल आणि रोमारियो शेफर्ड यांना बाद केले. राहुलने 35 धावा केल्या, तर शेफर्ड शुन्यावर बाद झाला.

अखेर मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरनने लखनऊला विजयापर्यंत पोहचवले. मार्कस स्टॉयनिस 10 धावांवर आणि निकोलस पूरन 11 धावांवर नाबाद राहिला.

तत्पूर्वी, या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हैदराबादकडून मंयक अगरवाल आणि अनमोलप्रीत सिंग यांनी डावाची सुरुवात केली. त्यांची चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता.

पण मयंकने 8 धावांवर असताना कृणाल पंड्याविरुद्ध खेळताना मार्कस स्टॉयनिसकडे झेल दिला. त्यानंतर मात्र, हैदराबादचे फलंदाज नियमित अंतराने बाद झाले. पंड्याने 8 व्या षटकात हैदराबादला दोन सलग चेंडूत दोन मोठे धक्के दिले. त्याने अनमोलप्रीतला 31 धावांवर आणि कर्णधार एडेन मार्करमला शुन्यावर बाद केले.

नंतर हॅरी ब्रुकही 3 धावांवर बाद झाला. त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि वॉशिंग्टन सुंदरने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची भागीदारी 18 व्या षटकात यश ठाकूरने त्रिपाठीला 35 धावांवर बाद केले. त्यापुढच्याच षटकात वॉशिंग्टन सुंदर आणि आदिल राशीद यांना अमित मिश्राने बाद केले.

अखेर हैदराबादला 20 षटकात 8 बाद 121 धावाच करता आल्या. हैदराबादकडून अब्दुल सामद 21 धावांवर नाबाद राहिला. लखनऊकडून कृणाल पंड्याने 3 विकेट्स घेतल्या, अमित मिश्राने 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर यश ठाकूर आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; साडेसहा कोटींच्या मंडपाचा शोध!

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

Babu Ajgaonkar: 'माझे कितीही पुतळे जाळा, मी 2027 ची निवडणूक लढवणारच'! बाबू आजगावकरांचा निर्धार

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

SCROLL FOR NEXT