IPL 2023: मनदीप सिंगने केला 'हा' लाजीरवाणा रेकॉर्ड नावावर, रोहित शर्मालाही टाकले मागे

IPL 2023 KKR vs RCB Match: आयपीएलच्या इतिहासात एका भारतीय फलंदाजाने अतिशय लाजीरवाणा विक्रम केला आहे.
Mandeep Singh
Mandeep SinghDainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2023 KKR vs RCB Match: आयपीएलच्या इतिहासात एका भारतीय फलंदाजाने अतिशय लाजीरवाणा विक्रम केला आहे. हा भारतीय क्रिकेटपटू आयपीएलच्या इतिहासातील सर्वात खराब फलंदाज ठरला आहे.

असा विक्रम या क्रिकेटरच्या नावावर नोंदवला गेला आहे, ज्यावर चाहत्यांना विश्वास बसणार नाही. क्रिकेटमधली सर्वात लाजीरवाणी गोष्ट म्हणजे फलंदाजाने शून्यावर बाद होणे.

मनदीप सिंगने हा लाजीरवाणा रेकॉर्ड केला

मनदीप सिंग हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरला आहे. मनदीप सिंग शून्यावर बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतण्याची ही 15 वी वेळ आहे. या बाबतीत त्याने दिनेश कार्तिक आणि रोहित शर्मालाही मागे टाकले आहे.

आयपीएलमध्ये (IPL) दिनेश कार्तिक आणि रोहित शर्मा 14-14 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात मनदीप सिंग शून्यावर बाद झाला. मनदीप सिंगला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीने बाद केले आणि तो शून्य धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.

Mandeep Singh
IPL 2023: रोहितच्या मुंबईसेनेत ऑस्ट्रेलियाचा घातक गोलंदाज सामील! जखमी रिचर्डसनची घेणार जागा

अतिशय लाजिरवाणा विक्रम केला

आयपीएलच्या इतिहासात पियुष चावला, हरभजन सिंग, पार्थिव पटेल, अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि अंबाती रायुडू 13 वेळा बाद झाल्यावर संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहेत.

वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन आणि नवोदित सुयश शर्मा या फिरकी त्रिकुटाने गुरुवारी ईडन गार्डन्सवर कहर केला. कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 81 धावांनी पराभव केला.

IPL मध्ये सर्वाधिक वेळा 'झिरो' वर बाद झालेले टॉप 10 फलंदाज

1. मनदीप सिंग - 15

2. रोहित शर्मा - 14

3. दिनेश कार्तिक - 14

4. पियुष चावला - 13

5. हरभजन सिंग - 13

Mandeep Singh
IPL 2023: शार्दुलच्या वादळी बॅटिंगनंतर KKRनं विणलं फिरकीचं जाळं! RCB चा दारूण पराभव

6. पार्थिव पटेल – 13

7. अजिंक्य रहाणे – 13

8. अंबाती रायुडू – 13

9. राशिद खान – 12

10. सुनील नारायण– 12

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com