Harsha Bhogle CSK Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 Final : पावसामुळे मॅच थांबली; तरीही चेन्नई जिंकू शकते ट्रॉफी; कसे? हर्षा भोगले यांनी सांगितलं समीकरण

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होत असलेल्या आयपीएल २०२३ फायनलमध्ये राखीव दिवशीही पावसाने हजेरी लावली आहे.

Pranali Kodre

Chennai Super Kings vs Gujarat Titans, IPL 2023 Final: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होत आहे. हा सामना रविवारीच होणार होता. पण रविवारी अहमदाबादमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने राखीव दिवशी हा सामना सोमवारी सुरू झाला.

मात्र, सोमवारी गुजरात टायटन्सच्या संघाची 20 षटके पूर्ण फलंदाजी झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स फलंदाजीला आल्यानंतर पहिल्याच षटकावेळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पुन्हा सामना थांबला.

दरम्यान, पावसाची सर जोरात आल्याने मैदान ओले झाले आहे. आता पुन्हा रात्री 10.45 वा सामनाधिकारी मैदानाची तपासणी करणार आहेत. त्यानंतर सामना कधी सुरू होणार हे समजेल.

साधारण 12 वाजेपर्यंत तरी सामन्यातील षटके कमी होणार नाही. मात्र, त्यानंतर डकवर्थ लुईस नियम लागू केला जाईल आणि षटके कमी होण्यास सुरुवात होईल.

यादरम्यान समालोचक हर्षा भोगले यांनी एक समीकरण मांडले आहे. त्यांनी ट्वीट केले आहे की 'डकवर्थ लुईस नियमानुसार लक्ष्य मिळण्यासाठी अद्याप 2 तास आहेत. पण जर तुम्हाला त्यात स्वारस्य असेल तर, चेन्नईला विजेतेपद मिळवण्यासाठी 5 षटकांमध्ये बिनबाद 44 धावा किंवा 1 बाद 50 धावा किंवा 2 बाद 57 धावा असे समीकरण असेल.'

रविवारीही झालेला पाऊस

रविवारी हा सामना होणार होता. पण रात्री 11 वाजेपर्यंत वाट पाहाण्यात आली पण मुसळधार पाऊस झाल्याने हा सामना होण्यासाठी योग्य परिस्थितीत नव्हती. त्याचमुळे हा सामना सोमवारी राखीव दिवशी हलवण्यात आला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच राखीव दिवशी सामना खेळवला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT