IPL 2021: KKR beat DC & and reached in IPL Final
IPL 2021: KKR beat DC & and reached in IPL Final Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2021: 'खेला होबे' म्हणत KKR ने DC ला केले गारद

दैनिक गोमन्तक

IPL 2021 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये DC ने KKR चा 3 गडी राखून पराभव केला आहे . कोलकाता नाईट रायडर्सने दिल्लीला हरवून अंतिम फेरीत स्थान मिळवले आणि आता त्यांचा सामना 15 ऑक्टोबरला CSKशी होणार आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने शारजाह येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये 20 षटकांत 5 बाद 135 धावा केल्या.तर कोलकाता नाईट रायडर्सने एक चेंडू राखत हा सामना जिंकला. कोलकाताला जिंकण्यासाठी शेवटच्या दोन चेंडूंत 6 धावांची गरज होती आणि राहुल त्रिपाठीने षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून देत KKR ला फायनलमध्ये पोहोचवलं. (IPL 2021: KKR beat DC & and reached in IPL Final)

व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी आणि शुभमन गिल कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयाचे खरे हिरो ठरले. या महत्त्वाच्या सामन्यात व्यंकटेश अय्यरने 41 चेंडूत 55 धावा केल्या. वेंकटेश अय्यरने त्याच्या अर्धशतकी खेळीत 3 षटकार आणि 4 चौकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 134.15 होता. शारजाच्या खेळपट्टीवर असा स्ट्राईक रेट खरोखर आश्चर्यकारक मानला जात आहे. वेंकटेश अय्यरने शुभमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी 74 चेंडूत 96 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी दिल्ली कॅपिटल्सवर भारी होती . दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जेव्हा कोलकाताने दोन्ही वेळा अंतिम फेरीत स्थान मिळवले, तेव्हा त्याने विजेतेपदही पटकावले. कोलकात्याने 2012 आणि 2014 मध्ये आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवला होता.

शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी KKR ला अप्रतिम सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 96 धावा जोडून दिल्ली कॅपिटल्सला सामन्याबाहेर काढले होते, पण व्यंकटेश अय्यरची विकेट पडताच सामना अचानक बदलला. कागिसो रबाडाने सामन्यात दिल्लीचे पुनरागमन केले. त्याने प्रथम वेंकटेश अय्यरला बाद केले आणि त्यानंतर या वेगवान गोलंदाजाने 18 व्या षटकात फक्त 1 धावा देऊन दिनेश कार्तिकची विकेटही घेतली.

19व्या षटकात नॉर्कियाने इयोन मॉर्गनलाही अवघ्या ३ धावांवर बाद केले आणि शेवटच्या षटकात केकेआरला 6 चेंडूत 7 धावांची गरज होती. अश्विनने शेवटचे षटक टाकले आणि पहिल्या चार चेंडूंमध्ये त्याने शाकिब अल हसन आणि सुनील नरेनला अवघ्या 1 धावांवर बाद करून सामना रोमांचक बनवला. शेवटच्या दोन चेंडूंवर, केकेआरला 2 चेंडूत 6 धावांची गरज होती आणि राहुल त्रिपाठीने आपल्या संघाला अंतिम फेरीत नेण्यासाठी लाँग ऑफच्या दिशेने षटकार ठोकला.आणि या साऱ्या थरारक सामन्यानंतर KKR फायनलमध्ये पोहोचली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dhargal Hit And Run Case: धारगळमध्ये तो अपघात नव्हे खूनच! उत्तर प्रदेशच्या दोघांना अटक

Lost From Beach: गोव्यात विविध बीचवरुन पाच मुले बेपत्ता; 'दृष्टी'ने घडवली कुटुंबियांशी पुन्हा भेट

Margao Session Court: वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी

Vasco News : चिखलीत बिल्डरने अवैधपणे बनवली पार्किंगसाठी जागा

Pernem Rain : वादळी वाऱ्यामुळे पेडणे तालुक्यात पडझड सुरूच

SCROLL FOR NEXT