गोव्याची हॉकी पिछाडीवर Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याची हॉकी पिछाडीवर

41वर्षांनंतर पुरुष हॉकीत ऑलिंपिक पदक जिंकल्यामुळे देशवासीयांसह गोमंतकीयही आनंदले आहेत.

दैनिक गोमन्तक

टोकियो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympics) भारताने (India) जर्मनीला हरवून ब्राँझपदक जिंकले. तब्बल 41वर्षांनंतर पुरुष हॉकीत (Hockey) ऑलिंपिक पदक जिंकल्यामुळे देशवासीयांसह गोमंतकीयही (Goa) आनंदले आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी ब्राँझपदक विजेत्या संघाचे अभिनंदन केले आहे. मूळ गोमंतकीय हॉकीपटूंनी भारतीय संघासाठी यापूर्वी योगदान दिले आहे; पण राज्यातील हॉकी खेळाची सद्यस्थिती अतिशय दयनीय आहे. साधनसुविधांचा पूर्ण अभाव आहे. (Inspired by India's success in Tokyo Olympics Goa government is expected to wake up for betterment of hockey in state)

पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलातील हॉकी मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲस्ट्रो टर्फ आले आहे; परंतु इतर सुविधा अपूर्णावस्थेत आहेत. याला जबाबदार कोण? हा प्रश्न राज्यातील हॉकीप्रेमींना पडला आहे. भारताच्या टोकियो ऑलिंपिक यशाने प्रेरित होऊन गोवा सरकार राज्यातील हॉकीच्या भल्यासाठी खडबडून जागे होईल, अशी अपेक्षा आहे.

मध्यंतरीच्या काळात भारतीयांची राष्ट्रीय खेळामधली रूची कमी झाली होती मात्र हॉकीसाठीचे प्रेम भारतीय महिला हॉकी संघाने भारतवासीयांमध्ये परत आणले. भारतीयांना राष्ट्रीय खेळाच्या पुन्हा प्रेमात पडायला भाग पाडले. सुरवातीच्या काही सामन्यांमध्ये महिलांना अपयश आले मात्र ऑस्ट्रेलियाला पराभवाची धुळ चारल्यानंतर भारतीय महिला संघाच्या आत्मविश्वासात भर पडली. त्यांनंतर भारतीय महिला हॉकीमध्ये एक नवसंजिवनीच निर्माण झाली.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतीय महिला हॉकी संघाशी (Indian women's hockey team) फोनवरुन संवाद साधला. पदकाची संधी हुकल्याने निराश झालेल्या भारताच्या लेकींचे मनोबल वाढिण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला. 'तुम्ही केलेल्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. इतक्या वर्षानंतर भारतीय हॉकीचे नाव तुम्ही मोठे केले. त्यामुळे आजिबात निराश होऊ नका, खचून जाऊ नका. असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांशी बोलताना भारतीय हॉकीपटूंच्या डोळ्यातून पाणी येत होते. हॉकी संघाच्या कामगिरीने विजयासाठी केलेला संघर्ष आणि कष्ट सध्याच्या तसेच भविष्यातील हॉकीपटूंसाठी मोठी प्रेरणा असणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

SCROLL FOR NEXT