जर ही मालिका झाली नाही तर यात इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (ECB) मोठे नुकसान झेलावे लागणार आहे.  Dainik Gomantak
क्रीडा

INDvsENG: मालिका कोरोनाच्या विळख्यात, रद्द झाल्यास हजारो कोटींचे नुकसान

जर ही मालिका झाली नाही तर यात इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (ECB) मोठे नुकसान झेलावे लागणार आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डामध्ये सध्या खळबळ माजली आहे.

दैनिक गोमन्तक

भारत आणि इंग्लंड (India and England) यांच्यात 4 ऑगस्टपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. ही मालिका बऱ्याच अर्थाने महत्त्वाची असून, या मालिकेपासून जागतिक कसोटी क्रिकेटच्या दुसऱ्या पर्वाला (WTC 2) सुरुवात होणार आहे. पण ब्रिटनमध्ये पुन्हा कोरोनाने (Covid 19) डोकेवर काढल्याने या मालिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहण्यास सुरुवात झाली आहे. त्यात इंग्लंडच्या संघातील अनेक खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. पण जर ही मालिका झाली नाही तर यात इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (ECB) मोठे नुकसान झेलावे लागणार आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डामध्ये सध्या खळबळ माजली आहे.

भारत विरुध्द इंग्लंड यांच्यातील मालिका रद्द झाल्यास इंग्लंडच्या बोर्डाला साधारण 1024 कोटींच्या नुकसाला सामोरे जावे लागू शकते. यामुळे आता ईसीबीची झोप उडाली आहे. यासाठी त्यांनी भारत-इंग्लंड मालिके आधी कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. पाकिस्तानच्या मालिके आधी झालेल्या कोरोना चाचणीत इंग्लंडच्या कर्णधारासह 7 खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे ईसीबी या सर्वांचे विलगिकरण केले असून, एका रात्रीत पाकिस्तान विरुध्दच्या मालिकेसाठी नवीन संघाची घोषणा देखील केली आहे.

इंग्लंड आणि भारत यांच्यातील मालिकेआधी दोन्ही संघातील खेळाडूंचे लसीकरण करण्याचा ईसीबीचा प्रयत्न आहे. यामध्ये खेळाडूंना दोन्ही डोस देण्यात येतील. या मालिकेतून ईसीबीला साधारणपणे 137 मिलियन डॉलर मिळणार आहेत. तसेच या सिरीजनंतर युएईमध्ये आधी आयपीएल आणि नंतर टी-20 वर्ल्डकपचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT