Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty Dainik Gomantak
क्रीडा

Korea Open: सात्विक-चिरागने पुन्हा उंचावलं भारताचं नाव! अव्वल मानांकित जोडीला पराभूत करत जिंकले विजेतेपद

Pranali Kodre

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty wom Korea Open 2023:

बॅडमिंटनमधील भारताची स्टार जोडी सात्विकसाईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी कोरिया ओपन सुपर 500 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात सात्विक आणि चिराग यांनी इंडोनेशियाच्या अव्वल मानांकित फजर एल्फिएन आणि मोहम्मद रियान आर्डिआन्तो या जोडीला पराभूत करत हे विजेतेपद पटकावले.

सात्विक आणि चिराग यांनी फजर एल्फिएन आणि मोहम्मद रियान आर्डिआन्तो जोडीला 17-21, 21-13, 21-14 अशा तीन सेटमध्ये पराभूत केले. इंडोनेशियाच्या या जोडीवर सात्विक आणि चिरागचा सलग दुसरा विजय होता. त्यांनी गेल्याच महिन्यान इंडोनेशिया ओपन स्पर्धेत या जोडीवर मात केली होती.

तसेच सात्विक आणि चिरागने कोरिया ओपनचे विजेतेपद जिंकण्यापूर्वी यावर्षी स्विस ओपन, बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशीप आणि इंडोनेशिया ओपन या स्पर्धांचे विजेतेपद जिंकले आहे.

सात्विक-चिरागचे शानदार पुनरागमन

कोरिया ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एल्फिएन आणि आर्डिआन्तो जोडीने पहिल्या गेममध्ये चांगली सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्या गेममध्ये मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवली होती. त्यांना सात्विक आणि चिरागने चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण पहिला गेम एल्फिएन आणि आर्डिआन्तो जोडीने 17-21 ने जिंकला.

मात्र, यानंतर चिराग आणि सात्विक यांनी जोरदार पुनरागमन केले. त्यांची एल्फिएन आणि आर्डिआन्तो यांचे कडवे आव्हान पेलत दुसरा गेममधील आघाडी कायम ठेवत हा गेम 21-13 असा जिंकला.

त्यामुळे सामना निर्णायक तिसऱ्या गेममध्ये गेला. तिसरा गेमही चिराग आणि सात्विकने सहज 21-14 असा जिंकून सामन्यात विजय मिळवलाच याबरोबरच विजेतेपदावर नावही कोरले.

सात्विक आणि चिराग यांनीही यापूर्वीही भारतासाठी शानदार कामगिरी केली आहे. आत्तापर्यंतच्या भारताच्या यशस्वी बॅडमिंटन जोड्यांपैकी एक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT