Canada Open 2023: लक्ष्य सेनची विजेतेपदाला गवसणी! थरारक फायनलमध्ये चीनच्या खेळाडूला पाजलं पाणी

Lakshya Sen: लक्ष्य सेन कॅनडा ओपनमध्ये विजेतेपदाला गवसणी घातली आहे.
Lakshya Sen
Lakshya SenDainik Gomantak
Published on
Updated on

Lakshya Sen win Canada Open Super 500: भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने कॅनडा ओपन सुपर 500 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. त्याने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या ली शी फेंगला पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरले.

राष्ट्रीकुल सुवर्णपदक विजेत्या लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड चॅम्पियन ली शी फेंगला 21-18, 22-20 असे सरळ गेम्समध्ये पराभूत केले. त्याने हा सामना जिंकताना दुसऱ्या गेममध्ये चार गेम पाँइंट्स वाचवले होते. तसेच सलग 6 पाँइंट्स मिळवले, त्यामुळे हा सामना निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये गेला नाही.

सेनचे हे बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरचे दुसरे विजेतेपद आहे. त्याने यापूर्वी जानेवारी 2022 मध्ये इंडिया ओपन स्पर्धा जिंकली होती.

Lakshya Sen
Canada Open 2023: सेनचं आता 'लक्ष्य' फायनल! पीव्ही सिंधू मात्र सेमीफायनलमध्ये पराभूत

ली शी फेंगविरुद्धच्या अंतिम सामन्यात लक्ष्यने पहिल्या गेममध्ये चांगली सुरुवात केली होती. त्याने 6-2 अशी आघाडीही घेतली होती. पण नंतर ली शी फेंगनेही 15-15 अशी बरोबरी केली. पण सेनने त्याचे आक्रमण कायम ठेवले आणि तीन जलद पाँइंट्स मिळवले. अखेरीस सेनने पहिल्या गेममध्ये 21-18 असा विजय मिळवला.

दुसऱ्या गेममध्ये ली शी फेंगने 20-16 अशी आघाडी घेतली होती. पण लक्ष्य सेनने पुनरागमन करत हा सामना जिंकला. त्याचबरोबर त्याने विजेतेपदही नावावर केले.

Lakshya Sen
Badminton World Federation Rankings: एचएस प्रणॉय ठरला जगातील सातवा शटलर, पीव्ही सिंधूलाही झाला मोठा फायदा!

लक्ष्य सेनने शनिवारी जपानच्या केंन्टो निशीमोटो याला उपांत्य फेरीत पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. सेनने निशीमोटोला 21-17 21-14 असे पराभूत केले होते. गेल्यावर्षी राष्ट्रकुल स्पर्धेतील विजयानंतरचे सेनचे हे पहिलेच विजेतेपद आहे.

ऑगस्ट 2022 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकल्यानंतर लक्ष्यच्या नाकावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यातून त्याला सावरायला काही वेळ गेला. त्यानंतर काही स्पर्धांमध्ये त्याला लवकर बाहेर पडावे लागले. पण त्याने थायलंड ओपनची उपांत्य फेरी गाठत पुनरागमन केले होते आणि आता त्याने कॅनडा ओपनचे विजेतेपद मिळवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com