Indonesia Open 2023 Final: चिराग शेट्टी-सात्विक साईराजची ऐतिहासिक कामगिरी, इंडोनेशिया ओपन जिंकून रचला इतिहास!

Indonesia Open 2023 Final: चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज या भारतीय जोडीने इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावले आहे.
Chirag Shetty And Satwik Sairaj
Chirag Shetty And Satwik Sairaj Dainik Gomantak

Indonesia Open 2023 Final: चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज या भारतीय जोडीने इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारतीय जोडीने अॅरॉन चिया आणि सोह वुई यिक या मलेशियाच्या जोडीचा 21-17, 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव करुन इतिहास रचला. अॅरॉन चिया आणि सोह वुई यिक ही जोडी पुरुष दुहेरीत जगज्जेते आहे.

चिराग-सात्विकची जोडी

चिराग-सात्विक जोडी BWF वर्ल्ड टूर सुपर-1000 विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय जोडी ठरली आहे. एवढेच नाही तर BWF वर्ल्ड टूरवर सुपर-100, सुपर-300, सुपर-500, सुपर-750 आणि सुपर-1000 या चारही विजेतेपदे जिंकणारी ही एकमेव भारतीय जोडी आहे.

Chirag Shetty And Satwik Sairaj
Indonesia Open च्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधूला पराभवाचा धक्का

दरम्यान, ओपनच्या अंतिम सामन्यात भारतीय आणि मलेशियाच्या जोडीमध्ये चुरशीची लढत झाली. भारतीय स्टार्संनी हा सामना सरळ गेममध्ये म्हणजे 2-0 असा जिंकला. पहिल्या गेममध्ये भारतीय जोडीने मलेशियाच्या (Malaysia) खेळाडूंचा 21-17 असा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये विजयाचा स्कोअर 21-18 असा होता. म्हणजेच दोन्ही गेममध्ये जय-पराजयाचे अंतर 5 गुणांपेक्षा कमी राहिले.

Chirag Shetty And Satwik Sairaj
Novak Djokovic wins French Open 2023: नोव्हाक जोकोविचने रचला इतिहास, फायनलमध्ये कॅस्पर रुडचा पराभव करुन जिंकले 23 वे ग्रँडस्लॅम

उपांत्य फेरीतही शानदार विजय मिळवला होता

याआधी, भारतीय जोडीने दक्षिण कोरियाच्या (South Korea) कान मिन आणि सेओ सेउंग यांचा 17-21, 21-19, 21-18 असा तीन गेममध्ये पराभव करुन विजेतेपदाच्या लढतीत दणका दिला होता. कोणतीही BWF 1000 फायनलमध्ये पोहोचण्याची ही पहिलीच वेळ होती, परंतु भारतीय जोडीची नजर विजेतेपदावर होती आणि त्यांनी रविवारी संपूर्ण देशाला आनंदाची बातमी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com