Indian women's team Dainik Gomantak
क्रीडा

Women's World Cup: सेमी फायनलसाठी भारतासह तीन संघात 'कांटे की टक्कर'

दैनिक गोमन्तक

महिला विश्वचषक 2022 (Women's World Cup 2022) मध्ये मंगळवारी भारताने बांगलादेशचा 110 धावांनी पराभव केला. या विजयामुळे टीम इंडियाचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्याच्या गुणतालिकेत टीम इंडिया (Team India) सहा गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा विश्वचषक आठ संघांमध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवला जात असून अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

27 मार्च रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना

भारताला आता 27 मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळायचा आहे. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर त्याला इतर कोणत्याही संघाच्या पराभवावर किंवा विजयावर अवलंबून राहावे लागणार नाही. अशावेळी भारताचे आठ गुण होतील. त्यामुळे दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहून उपांत्य फेरीसाठी भारतीय संघ पात्र ठरेल.

त्याचवेळी, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा शेवटचा साखळी फेरीचा सामना गमावला, तर उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. ऑस्ट्रेलियन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचे अंतिम चारमधील स्थानही निश्चित झाले आहे. अशा स्थितीत उपांत्य फेरीच्या शेवटच्या दोन स्थानांसाठी तीन संघांमध्ये स्पर्धा आहे. हे तीन संघ आहेत - भारत, वेस्ट इंडिज (West Indies) आणि इंग्लंड (England).

हे तीन संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले

पाकिस्तान आणि बांगलादेश उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर आहेत. त्याचवेळी यजमान न्यूझीलंडचे अंतिम चारमध्ये पोहोचणे नगण्य आहे. या संघाचे सहा सामन्यांतून दोन विजय आणि चार पराभवांसह चार गुण आहेत. सध्याचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. त्यांना उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानविरुद्धचा शेवटचा साखळी सामना (26 मार्च) जवळपास 150-200 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकावा लागेल.

तसेच, भारत आणि वेस्ट इंडिज हे त्यांचे शेवटचे साखळी सामने मोठ्या फरकाने हरतील अशी अपेक्षा आहे. यासोबतच इंग्लंडचाही दोन सामन्यांत पराभव झाला आहे.

हरल्यास टीम इंडिया उपांत्य फेरीत कशी पोहोचेल?

भारतीय संघ शेवटचा सामना हरला तर उपांत्य फेरीत कसा पोहोचेल? जिंकल्यानंतर टीम इंडियाला अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. जर दक्षिण आफ्रिकेने भारताला पराभूत केले, तर अशा परिस्थितीत टीम इंडियाला वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड त्यांच्या शेवटच्या साखळी फेरीतील सामने जिंकणार नाही यासाठी प्रार्थना करावी लागेल. कारण भारताचा सध्याचा रन रेट प्लसमध्ये आहे.

त्याचबरोबर वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचा रन रेट मायनसमध्ये आहे. तो हरला तर त्यांचा रनरेट अधिक मायनस जाईल. भारतीय संघ अंतिम चारमध्ये स्थान मिळवू शकेल. या स्थितीत टीम इंडिया तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर राहून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. इंग्लंडने आतापर्यंत पाच सामने खेळले असून दोन सामने बाकी आहेत. वेस्ट इंडिजचा शेवटचा साखळी सामना 23 मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्‍येने गोव्‍यात यावे'; गुजरातमधील परिषदेत मुख्‍यमंत्री सावंतांचे आवाहन

Cutbona Jetty: कुटबण- मोबोर येथे आणखी ४ कॉलराबाधित सापडले! 'संख्‍या १८७' वर

St Estevam Accident: बाशुदेव कडे होते रोख '१ लाख' रुपये? २३ सप्टेंबरनंतरच ‘ती’ जबाब द्यायला गोव्यात येणार

Goa Cabinet Reshuffle: पक्षश्रेष्ठी महाराष्ट्राच्या निवडणुकीत गर्क; गोवा मंत्रिमंडळाची पुनर्रचना पुन्हा लांबणीवर

Goa Accidents: गोव्यात अपघातांचे सत्र सुरूच! आणखी तीन बळी; मांद्रेतील तिसऱ्या तरुणीचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT