Women’s World Cup 2022: ऑस्ट्रेलियाची विजयी घौडदौड सुरुच, वेस्ट इंडिज चा उडावला धुव्वा

आयसीसी महिला विश्वचषकातील (Women’s World Cup 2022) सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा पराभव केला. ऑस्ट्रेलियन संघाने 7 गडी राखून हा विजय नोंदवला.
Australia
AustraliaDainik Gomantak
Published on
Updated on

आयसीसी महिला विश्वचषकातील सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा पराभव केला. ऑस्ट्रेलियन संघाने 7 गडी राखून हा विजय नोंदवला. यासह त्यांनी विजयाचा चौकारही लगावला. वास्तविक, ऑस्ट्रेलियाचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय ठरला आहे. आतापर्यंत त्यांनी 4 सामने खेळले असून सर्व जिंकले आहेत. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा (West Indies) 4 सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे. पहिले दोन सामने जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजचा विजय रथ भारतीय संघाने रोखला आणि आता ऑस्ट्रेलियानेही (Australia) त्यांना पराभूत केले. वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 132 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे त्यांनी 30.2 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले. आणि, अशा प्रकारे 7 गडी राखून सामना जिंकला. ऑस्ट्रेलियासाठी रेचेल हॅन्सने भूमिका महत्त्वाची निभावली. (Australia beat West Indies in ICC Women's World Cup)

जेव्हा वेस्ट इंडिजने सामन्यात उत्साह आणला होता

ऑस्ट्रेलियन संघ वेस्ट इंडिजकडून लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा हे सोपे लक्ष्य असून खेळ काहीसा एकतर्फी होईल, असे वाटत होते. परंतु, फलंदाजीत अपयशी ठरलेल्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी आपल्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने सामन्यात उत्साह आणला. त्यांनी 10 धावांच्या आत ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के दिले. त्यात अ‍ॅलिसा हिली आणि मॅग लेनिंग यांच्या विकेट्सचा समावेश होता. यानंतर स्कोअर बोर्ड 50 चा आकडा पार करताच ऑस्ट्रेलियालाही तिसरा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाच्या या तीन विकेट्समध्ये एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे सर्व झेल बाद झाले. आणि विशेष म्हणजे सर्व झेल हेली मॅथ्यूजने टिपले.

परंतु, त्यानंतर वेस्ट इंडिजला दुसरी विकेट घेण्यात अपयश आले. रॅचेल हॅन्स आणि बेथ मुनी यांच्यात चांगली भागीदारी होती, ज्याने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. हॅन्स 83 धावांवर नाबाद राहिली तर मुनी 28 धावा करुन नाबाद परतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com