ICC Women's World Cup: भारताचं भविष्य आता पाकिस्तानच्या हातात, जाणून घ्या

महिला विश्वचषक 2022 (ICC Women's World Cup) मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव करुन सलग पाचवा सामना जिंकला आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

महिला विश्वचषक 2022 (Women's World Cup) मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव करुन सलग पाचवा सामना जिंकला आहे. उपांत्य फेरी गाठणारा ऑस्ट्रेलिया (Australia) पहिला संघ बनला आहे. त्याचवेळी पाच सामन्यांतील तिसऱ्या पराभवामुळे भारतासाठी उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे. तथापि, तरीही भारताचा (India) रनरेट खूपच चांगला आहे. टीम इंडिया (Team India) आपले दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरी गाठू शकते. दुसरीकडे, पाकिस्तानने (Pakistan) सर्व सामने जिंकल्यास किंवा दोनपैकी केवळ एक सामना जिंकला तरी भारत उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. इथे आम्ही उपांत्य फेरीचे संपूर्ण गणित समजावून सांगत आहोत. (India could still qualify for the semi-finals of the ICC Women's Cricket World Cup)

दरम्यान, पाचही सामने जिंकून ऑस्ट्रेलियाचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही आपले चार सामने जिंकले असून उपांत्य फेरी गाठणे जवळपास निश्चित झाले आहे. उर्वरित दोन जागांसाठी भारत, वेस्ट इंडिज (West Indies), न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात स्पर्धा आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान देखील उपांत्य फेरीच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडलेले नाहीत, परंतु या दोन्ही संघांना अव्वल चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी चमकदार कामगिरी करावी लागणार आहे, ज्याची शक्यता फारच कमी आहे.

Team India
ICC Womens World Cup 2022: स्मृती मंधाना अन् हरमनप्रीत कौर ने रचला इतिहास

भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचेल

भारतासमोर उपांत्य फेरी गाठण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धचे उर्वरित दोन्ही सामने जिंकले पाहिजेत. त्याचबरोबर चांगल्या रनरेटच्या आधारावर गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहून उपांत्य फेरी गाठावी लागणार आहे. या स्थितीत भारत उपांत्य फेरीच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघासोबत भिडणार आहे.

दुसरीकडे भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाला तरी उपांत्य फेरी गाठू शकतो. या स्थितीत भारताला बांगलादेशवर विजय मिळवावा लागेल त्यानंतर सहा गुणांसह टीम इंडिया उपांत्य फेरी गाठू शकेल. या स्थितीत इंग्लंड आणि न्यूझीलंडचे संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडू शकतात. यासाठी अनेक सामन्यांचा निकाल भारताच्या बाजूने येणे आवश्यक आहे.

Team India
ICC Women World Cup साठी टीम इंडिया मुंबईहून होणार रवाना

भारताने उपांत्य फेरी गाठणे हे काय समीकरण

1. पाकिस्तानने पहिले चार सामने गमावले आहेत. आता पाकिस्तानने उर्वरित तीन सामने जवळच्या फरकाने जिंकले पाहिजेत. त्यामुळे इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज बाहेर पडतील. भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग थोडा सोपा होईल. या स्थितीतही पाकिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

2. बांगलादेश संघाने चारपैकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे आता त्यांना भारताला हरवून इंग्लंडला हरवायला हवे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याच्या निकालाचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. या स्थितीत बांगलादेशही उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

Team India
Women World Cup 2022: स्मृती मंधाना ‘या’ सिंगरला करतेय डेट!

3. इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केले, परंतु पाकिस्तान आणि बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला. अशा स्थितीत इंग्लंडचे चार गुण होतील. त्यामुळे इंग्लंडही उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

4. न्यूझीलंड इंग्लंड, बांगलादेश आणि पाकिस्तानकडून पराभूत झाला आहे. अशा स्थितीत किवी संघाचे केवळ चार गुण शिल्लक राहतील आणि भारत सहा गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचेल.

एकूणच, भारतीय संघाला आता ऑस्ट्रेलियाने त्यांचे उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावेत अशी इच्छा आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेनेही तीन पैकी दोन सामने मोठ्या फरकाने जिंकले, तर भारताकडून पराभूत किंवा जवळच्या फरकाने विजय मिळवावा लागेल. दुसरीकडे, पाकिस्तानला तीनपैकी दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग सोपा होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com