Indian Cricket Fans Dainik Gomantak
क्रीडा

Team India: तब्बल चार महिन्यानंतर टीम इंडिया खेळणार इंटरनॅशनल मॅच! 'या' देशात रंगणार मालिका

भारतीय महिला संघ जुलैच्या सुरुवातीला परदेश दौऱ्यावर जाणार आहे.

Pranali Kodre

Indian women's team tour of Bangladesh for ODI and T20 Series reports: भारतीय पुरुष संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. याशिवाय भारतीय महिला संघ देखील जुलैच्या सुरुवातीला बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय महिला संघाला मर्यादीत षटकांच्या मालिका खेळायच्या आहेत.

भारतीय महिला संघाच्या बांगलादेश दौऱ्याबाबत क्रिकबजला बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या महिला विंगच्या अध्यश्रा शफिउल आलम चौधरी नादेल यांनी पुष्टी दिली आहे.

नादेल यांनी सांगितले की 'हो आम्ही भारतीय महिला राष्ट्रीय संघाविरुद्ध जुलैमध्ये मर्यादीत षटकांच्या मालिका खेळणार आहे. सर्व सामने शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळले जाणार आहेत.'

त्यामुळे आता तब्बल 11 वर्षांनी शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर महिलांचा आंतरराष्ट्रीय सामना पहाता येणार आहे. अखेरच्या वेळी बांगलादेशच्या महिला संघाने 2012 मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध सामना खेळला होता.

सध्या समोर आलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार टी२० मालिकेतील तीन सामने अनुक्रमे 9, 11 आणि 13 जुलै रोजी खेळले जातील. त्यानंतर वनडे मालिकेतील तीन सामने 16, 19 आणि 22 जुलै रोजी खेळले जातील.

दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की या मालिकांबद्दल अद्याप दोन्ही बोर्डकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

चार महिन्यांनी भारतीय संघ खेळणार

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तब्बल चार महिन्यांनी भारतीय महिला संघ आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसणार आहे. यापूर्वी 23 फेब्रुवारी 2023 रोजी महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध खेळला होता. हा टी20 वर्ल्डकपमधील उपांत्य सामना होता. या सामन्यात भारतीय महिला संघाला 5 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

त्यानंतर गेल्या चार महिन्यात भारतीय महिला संघाने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. दरम्यान, भारतीय महिला संघातील खेळाडू मार्चमध्ये पार पडलेल्या पहिल्या वूमन्स प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Xavier Exposition: शव प्रदर्शनाला 8 दशलक्ष लोकं हजेरी लावण्याची शक्यता; गोव्यात होणार 45 दिवसांचा भावदीव्य सोहळा

मंत्री गोविंद गावडेंच्या अडचणी वाढणार? Cash For job Scam प्रकरणात कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला अटक

Goa Politics: 'कळंगुट'सोडून मायकल मांद्रेतून लढणार? 2027 च्या निवडणुकीबाबत लोबोंचे मोठं भाष्य

Antony Thattil: 15 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अडकणार लग्नबंधनात; कोण आहे कीर्तीचा करोडपती नवरा?

IFFI 2024: मडगावात यंदा इफ्फीतील चित्रपट प्रदर्शन खुल्या जागेत होणार; रवींद्र भवनच्या अध्यक्षांची माहिती

SCROLL FOR NEXT