Team India मध्ये वाहणार बदलाचे वारे? वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी 'या' IPL स्टार्सला मिळू शकते संधी

जुलै महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिज दौरा करणार असून यावेळी बेंच स्ट्रेंथ आजमवली जाऊ शकते.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Rinku Singh, Yashasvi Jaiswal likely picked in Team India: भारतीय क्रिकेट संघाला कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाविरुद्ध 209 धावांनी मोठा पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आता या सामन्यानंतर भारतीय संघाला जवळपास एक महिन्यांचा ब्रेक मिळणार आहे.

भारतीय संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारताचा संघ वेस्ट इंडीज विरुद्ध 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांची मालिका खेळताना दिसणार आहे. दरम्यान अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार या दौऱ्यात भारतीय निवड समीती ब्रेंच स्ट्रेंथला आजमावून पाहू शकते.

आयपीएलमधील कामगिरीचे मिळणार बक्षीस?

रिपोर्ट्सनुसार टी20 मालिकेसाठी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात अनेक नवे चेहरे दिसू शकतात. या मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली अशा दिग्गज खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. हे दोघे यापूर्वी भारताने अखेरीस खेळलेल्या टी20 मालिकेतही खेळले नव्हते.

Team India
WTC 2023 Final मधील पराभवानंतर आर अश्विनची आली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, 'पराभव निराशाजनक, पण...'

दरम्यान, वेस्ट इंडीजविरुद्ध टी20 संघात यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, जितेश शर्मा, ऋतुराज गायकवाड यांना संधी दिली जाऊ शकते. यातील ऋतुराजने याआधीच भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले आहे. दरम्यान, या सर्वांची आयपीएल 2023 मध्ये चांगली कामगिरी झाली होती.

जयस्वालने राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल 2023 मध्ये 14 सामन्यांमध्ये 163.61 च्या स्ट्राईक रेटने 625 धावा केल्या होत्या. ज्यात एका शतकाचा आणि 5 अर्धशतकांचा समावेश होता. तसेच रिंकू सिंगने कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएल 2023मध्ये सर्वाधिक धावा केल्या. त्याने 14 सामन्यांमध्ये 474 धावा केल्या.

याशिवाय जितेश शर्माने 14 सामन्यांमध्ये 156.06 च्या स्ट्राईक रेटने 309 धावा केल्या. तसेच ऋतुराजनेही चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएल 2023 मध्ये शानदार खेळ करताना 147.50 च्या स्ट्राईक रेटने 590 धावा केल्या.

कसोटी संघातही वाहणार बदलाचे वारे

कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाने जयस्वाल, मुकेश कुमार यांना राखीव खेळाडूंमध्ये ठेवले होते. तसेच ऋतुराजचीही राखीव खेळाडूंमध्ये निवड झाली होती. मात्र, लग्नामुळे तो इंग्लंडला गेला नव्हता. त्याच्याऐवजी जयस्वालला ही संधी मिळाली होती.

त्यामुळे या गोष्टी लक्षात घेता, अनुभवी खेळाडूंना विश्रांती देऊन या तिघांनाही कसोटी संघातही संधी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय सर्फराज खानही गेल्या अनेक महिन्यांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असून त्यालाही संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

Team India
WTC Final मध्ये रोहित शर्माने सुचवले 'हे' 3 मोठे बदल, ICC मान्य करेल का भारतीय कर्णधाराची मागणी?

वनडे संघात मात्र बदलाची शक्यता नाही

वनडे वर्ल्डकपसाठी आता केवळ 4-5 महिने बाकी असताना वनडे संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे वनडे संघात नियमित खेळणारे खेळाडूच खेळताना दिसू शकतात.

असा आहे वेस्ट इंडिज दौरा

बीसीसीआयने घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध आधी 12 ते 24 जुलै दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल, त्यानंतर 27 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका होईल, तर शेवटी 3 ऑगस्टपासून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. 13 ऑगस्ट रोजी या दौऱ्यातील अखेरचा टी20 सामना खेळला जाईल.

असे आहे भारतीय संघाचे वेस्ट इंडिज दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

  • कसोटी मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध भारत) - वेळ- संध्या. 7.30 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)

    12 - 16 जुलै - पहिला कसोटी सामना, विंडसोर पार्क स्पोर्ट्स स्टेडियम, डॉमिनिका

    20 - 24 जुलै - दुसरा कसोटी सामना, क्विंन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद

  • वनडे मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध भारत)- वेळ- संध्या. 7.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)

    27 जुलै - पहिला वनडे सामना, केन्सिंगटन ओव्हल, बार्बाडोस

    29 जुलै - दुसरा वनडे सामना, केन्सिंगटन ओव्हल, बार्बाडोस

    1 ऑगस्ट - तिसरा वनडे सामना, ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमी, त्रिनिदाद

  • टी20 मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध भारत) - वेळ- रात्री 8.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)

    3 ऑगस्ट - पहिला टी20 सामना, ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमी, त्रिनिदाद

    6 ऑगस्ट - दुसरा टी20 सामना, नॅशनल स्टेडियम, गयाना

    8 ऑगस्ट - तिसरा टी20 सामना, नॅशनल स्टेडियम, गयाना

    12 ऑगस्ट - चौथा टी20 सामना, ब्रोवार्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा

    13 ऑगस्ट - पाचवा टी20 सामना, ब्रोवार्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com