Hockey India Women Team
Hockey India Women Team Dainik Gomantak
क्रीडा

Indian Women Hockey टीमचे नेशन्स कप जिंकताच जंगी स्वागत अन् लाखांचे बक्षीसही जाहीर, व्हिडिओ व्हायरल

Pranali Kodre

Indian Women Hockey : भारतीय महिला हॉकी संघाने स्पेनमध्ये झालेल्या महिला नेशन्स कप 2022 स्पर्धेचे शनिवारी विजेतेपद जिंकले. त्यांनी अंतिम सामन्यात यजमान स्पेनला 1-0 अशा गोलफरकाने पराभूत करत या विजेतेपदाला गवसणी घातली. याबरोबरच भारतीय महिला हॉकी संघ महिला प्रो लीग 2023-24 स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

भारतीय महिला हॉकी संघाच्या या विजयानंतर सोमवारी संघातील खेळाडूंचे नवी दिल्लीतील विमानतळावर जोरदार स्वागत झाले. त्याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. तसेच विजेत्या संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठीही हॉकी इंडियाने बक्षीस जाहीर केले आहे.

हॉकी इंडियाने जाहीर केल्याप्रमाणे नेशन्स कप विजेत्या भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला 2 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

अंतिम सामन्यात भारताची बाजी

स्पेनमधील व्हॅलेन्सिया येथे झालेल्या महिला नेशन्स कपच्या अंतिम सामन्यात स्पेनने भारताविरुद्ध चांगली सुरुवात केली होती. मात्र, भारताने त्यांना त्याचा फायदा घेऊ दिला नाही. भारताकडून पहिल्याच क्वार्टरमध्ये 6 व्या मिनिटाला गुरजीत कौरने भारतासाठी पहिला गोल नोंदवला.

त्यानंतरही स्पेनने गोल करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. त्यांनी पेनल्टीही मिळवल्या. पण भारताच्या बचावाने यावेळी दमदार खेळ केला. त्यातही भारतीय संघाची कर्णधार आणि गोलरक्षक सविताने वाचवलेले गोल अप्रतिम होते. तिने चारही क्वार्टरमध्ये स्पेनला गोल करू दिला नाही. त्यामुळे भारतीय संघाला 1-0 अशी मिळवलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवता आली.

दरम्यान, भारताने या स्पर्धेत साखळी फेरीतील तिन्ही सामने जिकून ग्रुपमध्ये अव्वल स्थान मिळवले होते. त्यानंतर उपांत्य फेरीत भारतीय संघाने आयर्लंडला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

SSC Result Sanguem : सांगे तालुक्यात सरकारी शाळांची बाजी; दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

Nepal: नेपाळनेही एव्हरेस्ट, MDH मसाल्यावर घातली बंदी; धोकादायक केमिकलबाबत केली कारवाई

Ponda News : दारूच्या नशेत पर्यटकांची दादागिरी; दाभाळ येथील प्रकार

SCROLL FOR NEXT