Edu Garcia
Edu Garcia Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: फुटबॉलपटू गार्सियाची भारतातील कारकीर्द लांबली

किशोर पेटकर

पणजी: हैदराबाद एफसीने (Hyderabad FC) आगामी इंडियन सुपर लीग (Indian Super League) (आयएसएल) फुटबॉल मोसमासाठी करारबद्ध केल्यामुळे स्पेनचा आक्रमक मध्यरक्षक एदू गार्सिया (Edu Garcia) याची भारतातील कारकीर्द लांबली आहे. गतमोसमापर्यंत तो एटीके मोहन बागान (ATK Mohan Bagan) संघात होता.

हैदराबाद एफसीने 31 वर्षीय गार्सिया याच्याशी एका वर्षाचा करार केला आहे. नव्या संघातून खेळताना सर्वोत्तम कामगिरी करण्याचे ध्येय गार्सियाने बाळगले आहे. आपला संघ गुणतक्त्यात वरच्या स्थानी असावा यासाठी प्रयत्न असतील, असेही त्यांने नमूद केले. गार्सिया हा अष्टपैलू खेळाडू आहे. तो सेंटर मिडफिल्डर, अटेकिंग मिडफिल्डर, तसेच विंगर या जागी खेळू शकतो. त्याचा लाभ संघाला मोठ्या प्रमाणात होणार असल्याची आशा हैदराबाद एफसीचे प्रशिक्षक मानोला मार्किझ यांनी व्यक्त केली.

स्पेनमधील झारागोझा येथे जन्मलेला गार्सिया सर्वप्रथम भारतात 2017 साली दाखल झाला. त्याला बंगळूर एफसीने करारबद्ध केले. त्यानंतर तो काही काळ चीनमध्ये खेळला, त्यानंतर जानेवारी 2018 मध्ये कोलकात्यातील एटीके संघात दाखल झाला. या संघाने 2019-20 मोसमात एटीके संघाने आयएसएल स्पर्धा जिंकली. तेव्हा चेन्नईयीविरुद्ध गार्सियाने अंतिम लढतीत गोल केला होता. गतमोसमात एटीके मोहन बागानला आयएसएल स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले, तेव्हा गार्सिया या संघात होता.

दृष्टिक्षेपात...

- 47 आयएसएल सामन्यांत 10 गोल, 12 असिस्ट

- स्पेनमधील रेयाल झारागोझा संघाचा माजी सदस्य

- भारतात बंगळूर, एटीके, एटीके मोहन बागान संघाचे प्रतिनिधित्व

- 2019-20 मोसमातील आयएसएल अंतिम लढतीत गोल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT