Indian Super League: FC Goa pre-season training session at Salvador do Mundo Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: एफसी गोवाचा मोसमपूर्व सराव सुरू

Indian Super League: स्पॅनिश हुआन फेरांडो सलग दुसऱ्या मोसमासाठी प्रशिक्षक

दैनिक गोमन्तक

पणजीः एफसी गोवा (FC Goa) संघाने सोमवारपासून मोसमपूर्व सरावास (Pre-season Training) सुरवात केली. आगामी इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेचे लक्ष्य बाळगून यंदा संघाने लवकर शिबिरास सुरवात केली. एफसी गोवाने साल्वादोर द मुंद (Salvador do Mundo) पंचायत मैदानावर सराव केंद्र केले आहे. स्पॅनिश हुआन फेरांडो सलग दुसऱ्या मोसमासाठी एफसी गोवाचे प्रशिक्षक आहेत. गतमोसमात त्यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवा संघाने आयएसएल स्पर्धेची उपांत्य (प्ले-ऑफ) फेरी गाठली होती, तसेच एएफसी चँपियन्स लीगमधील पदार्पणात चमकदार खेळ केला होता. नव्या मोसमासाठी कर्णधार एदू बेदिया, इव्हान गोन्झालेझ, आल्बर्टो नोगेरा, होर्गे ऑर्टिझ या स्पॅनिश खेळाडूंचा करार कायम असून इगोर आंगुलोच्या जागी नवा स्ट्रायकर व एक आशियाई सदस्य देशाचा खेळाडू करारबद्ध होणे बाकी आहे.

एफसी गोवाने नव्या मोसमासाठी स्थानिक खेळाडूंत स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाचा बचावपटू कुणाल कुंडईकर व यूथ क्लब ऑफ मनोरा संघाचा मॅनूशॉन फर्नांडिस यांना करारबद्ध केले आहे. आगामी आयएसएल स्पर्धेपूर्वी एफसी गोवा संघ पुढील महिन्यात ड्युरँड कप स्पर्धेत सहभागी होण्याचे संकेत आहेत. एफसी गोवाचे मोसमपूर्व सराव शिबिर सोमवारपासून गोव्यातील, तसेच देशातील इतर भागातील खेळाडूंसह सुरू झाले. परदेशी खेळाडू कालांतराने सहभागी होणार आहेत. गतमोसमाप्रमाणे यंदाही आयएसएल स्पर्धा जैवसुरक्षा वातावरणात नोव्हेंबरपासून खेळली जाईल. आयोजकांनी सलग दुसऱ्या मोसमासाठी गोव्यात सामने खेळविण्यास पसंती दिली आहे. स्पर्धेची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT