Hugo Boomous Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: बुमूस एटीके मोहन बागान संघात

ह्यूगो बुमूस (Hugo Boomous) आगामी मोसमात कोलकात्याच्या एटीके मोहन बागानकडून खेळणार आहे. त्याचा हा करार दीर्घकालीन असल्याचे सांगण्यात येते.

किशोर पेटकर

पणजी: इंडियन सुपर लीग (Indian Super League) (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा (FC Goa) मुंबई सिटी एफसीच्या (Mumbai City FC) मध्यफळीत उल्लेखनीय ठरलेला ह्यूगो बुमूस (Hugo Boomous) आगामी मोसमात कोलकात्याच्या एटीके मोहन बागानकडून खेळणार आहे. त्याचा हा करार दीर्घकालीन असल्याचे सांगण्यात येते.

गतमोसमात मुंबई सिटीने आयएसएल करंडक आणि लीग विनर्स शिल्डचा मान मिळविला होता, त्या यशात बुमूसचाही वाटा राहिला. नव्या मोसमासाठी करारबद्ध केलेला बुमूस हा एटीके मोहन बागान संघातील सहावा नवा खेळाडू आहे. बुमूसने 2017-18 पासून आयएसएल स्पर्धेत 58 सामन्यांत 19 गोल नोंल नोंदविले असून 24 असिस्टची नोंद केली आहे. 2019-20 मोसमात तो स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरला होता.त्या मोसमात त्याने एफसी गोवातर्फे 15 सामन्यांत 11 गोल व 10 असिस्टची नोंद केली होती.

गतमोसमात मुंबई सिटीने त्याला एफसी गोवाकडून संघात घेताना 1.76 कोटी रुपये मोजल्याचे वृत्त होते, आता एटीके मोहन बागानने त्याच्यासाठी त्याहून जास्त रक्कम मोजल्याची माहिती आहे. फिनलंडचा आंतरराष्ट्रीय मध्यरक्षक जोनी काऊको याच्यानंतर कोलकात्यातील संघाने करारबद्ध केलेला बुमूस हा आणखी एक प्रमुख खेळाडू आहे. गतमोसमात बुमूसला दुखापतीने सतावले होते, तसेच निलंबनामुळे तो आयएसएल स्पर्धेतील चार सामने खेळू शकला नव्हता.

कोलकात्यास भारतीय फुटबॉलची मक्का मानले जाते. या शहरातील पारंपरिक आणि यशस्वी संघाशी करार करताना मला खूप आनंद होत आहे. करंडक जिंकण्यासाठी मी नेहमीच भुकेलेला असतो. मी खेळलेल्या संघाला यापूर्वी यश मिळवून दिलेले आहे. आता पुन्हा खेळताना हेच मी ध्यानात ठेवेन. जिंकण्यासाठी मी सर्वोत्तम क्षमतेने खेळेन, असे या फ्रेंच-मोरोक्कन खेळाडूने एटीके मोहन बागानच्या संकेतस्थळास सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT