Indian men's and women's archery team Dainik Gomantak
क्रीडा

Archery World Cup Stage 4: भारतीय तिरंदाजांची भरारी! जागतिक स्पर्धेत रिकर्व्हमध्ये दोन्ही संघांची पदकाची कमाई

स्टेज फोर जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी शानदार कामगिरी केली असून गुरुवारी पदकांची कमाईही केली.

Pranali Kodre

Indian men's and women's recurve archery team clinched bronze medals in World Cup Stage 4:

भारताचे तिरंदाज स्टेज फोर जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शानदार कामगिरी नोंदवत आहेत. गुरुवारी रिकर्व्ह प्रकारामध्ये भारताच्या महिला आणि पुरुष संघाने ब्राँझपदकाची कमाई केली आहे.

भारताच्या पुरुष संघात धीरज बोम्मादेवरा, अतानु दास आणि तुषार शेळके यांचा समावेश आहेत. या तिघांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने ब्राँझ पदकाच्या सामन्यात स्पेनचा ६-२ अशा फरकाने पराभव केला. स्पेनच्या संघात अँड्रे तेमिनो, युन सँचेझ आणि पाब्लो अछा यांता समावेश होता.

दुसरे मानंकन मिळालेल्या भारताच्या पुरुष संघाला उपांत्य सामन्यात तैवानविरुद्ध ०-६ अशा सरळ सेटमध्ये पराभूत व्हावे लागले. त्यामुळे त्यांना अंतिम सामन्यात जाता आले नाही.

महिला संघाबाबतही अशीच गोष्ट पाहायला मिळाली. भारताच्या महिला संघात अंकिता भकट, भंजन कौर आणि सिमरनजीत कौर यांचा समावेश होता. त्यांनाही उपांत्य सामन्यात तैवानकडूनच ०-६ अशा फरकाने पराभूत व्हावे लागले.

पण भारतीय महिला संघाने ब्राँझ पदकाच्या सामन्यात मेक्सिकोविरुद्ध शुट ऑफमध्ये विजय मिळवण्यात यश मिळवले. त्यामुळे ५-४ अशा फरकाने ही लढत जिंकत ब्राँझ पदकावर नाव कोरले.

दरम्यान, यापूर्वी भारताच्या महिला आणि पुरुष संघाने कंपाउंड प्रकारात अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांनी पदक निश्चित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT