Goa Under 19 Cricket Team : गोव्याचा 19 वर्षांखालील संभाव्य संघ जाहीर

गोव्याचा 19 वर्षांखालील संघ यंदा मोसमात एकदिवसीय, चार दिवसीय सामन्यांत खेळणार
Cricket
CricketDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Under 19 Cricket Team announce: गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) आगामी मोसमासाठी ज्युनियर (19 वर्षांखालील) क्रिकेट संघातील संभाव्य खेळाडूंची निवड केली आहे. संघाचे मोसमपूर्व शिबिर जयपूर येथे होईल, त्यानिमित्त खेळाडू 21 रोजी एका महिन्यासाठी रवाना होतील.

गोव्याचा 19 वर्षांखालील संघ यंदा विनू मांकड करंडक एकदिवसीय, तसेच कुचबिहार करंडक चार दिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत खेळणार आहे.

एकदिवसीय स्पर्धेत गोव्याचा ‘ड’ गटात समावेश असून अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, सौराष्ट्र, ओडिशा, राजस्थान या संघांचा समावेश आहे. स्पर्धा पुदुचेरी येथे 12 ऑक्टोबरपासून खेळली जाईल.

Cricket
Shreyas Iyer: अय्यरचा दिलदारपणा! गरिब चिमुकल्याला पाहाताच दाखवलं मोठं मन, पाहा Video

कुचबिहार करंडक स्पर्धा होम-अवे पद्धतीने १७ नोव्हेंबरपासून खेळली जाईल. गोव्याच्या एलिट अ गटात मुंबई, चंडीगड, त्रिपुरा, पंजाब, विदर्भ हे संघ आहेत.

मोसमपूर्व शिबिराव्यतिरिक्त गोव्याचा 19 वर्षांखालील संघ राजकोट येथे सप्टेंबरमध्ये एकदिवसीय स्पर्धेत खेळण्याचे नियोजन आहे. या स्पर्धेत यजमान सौराष्ट्रासह गुजरात व बडोद्याच्या संघाचा समावेश आहे.

जयपूरमधील शिबिरासाठी निवड झालेल्या खेळाडूंनी शुक्रवारी (ता. १८) पर्वरी येथील जीसीए कार्यालयात दुपारी तीन वाजता संपर्क साधावा.

Cricket
Jay Shah - Rahul Dravid: भारतीय क्रिकेटमध्ये होणार मोठा धमाका? जय शाह - राहुल द्रविडमध्ये झाली सिक्रेट मीटिंग

गोव्याचा 19 वर्षांखालील संभाव्य संघ

दिशांक मिस्कीन, वर्धन मिस्कीन, वीर यादव, रिजुल पाठक, यश कसवणकर, दर्पण पागी, शंतनू नेवगी, पुंडलिक नाईक, कौस्तुभ पिंगुळकर, रय्यान शेख, स्वप्नील गावकर, निश्चय नाईक, जीवनकुमार चित्तेम, अभिषेक दिवाडकर, रुद्रेश शर्मा, दर्शम महेंद्रकर, शिवांक देसाई, युवराज सिंग, रतीश ताटे, तनीष कडेकर, महंमद रेहान, पियुष देविदास, विनम्र धुरी, शिवेन बोरकर, वेदांत डब्राल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com