Leagues Cup Final: मेस्सीची जादू कायम अन् इंटर मियामीची लीग कपच्या फायनलमध्ये धडक

Lionel Messi: मेस्सीच्या नेतृत्वात इंटर मियामीने लीग कपच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे.
Lionel Messi
Lionel MessiDainik Gomantak
Published on
Updated on

Lionel Messi's Inter Miami reach the Leagues Cup final:

इंटर मियामी संघाने लीग कपच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. या संघाने लिओनल मेस्सी संघात दाखल झाल्यापासून कमालीचा खेळही दाखवला आहे. मेस्सीने सलग सहाव्या सामन्यात गोल केला.

इंटर मियामीने फिलाडेल्फिया युनियनला उपांत्य फेरीत 4-1 अशा गोलफरकाने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. विशेष म्हणजे मेस्सी काही दिवसांपूर्वीच इंटर मियामी संघात सामील झाला असून त्याच्या नेतृत्वाखाली इंटर मियामीने सर्व सहा सामने जिंकले आहेत.

Lionel Messi
Cristiano Ronaldo: जखमी रोनाल्डोचा तो गोल अन् अल-नासरने जिंकला अरब क्लब चॅम्पियन्स कप

दरम्यान, मियामीने फिलाडेल्फियाला पराभूत करत कॉन्कोकैफ चॅम्पियन्स कप 2024 स्पर्धेतही स्थान पक्के केले आहे. इंटर मियामीकडून मेस्सीने 6 सामन्यांमध्ये एकूण 9 गोल केले आहेत.

उपांत्य सामन्यात इंटर मियामीने फिलाडेल्फियाविरुद्ध शानदार सुरुवात केली होती. जोसेफ मार्टिनेझने तिसऱ्याच मिनिटाला पहिला गोल करत मियामीचे खाते उघडले होते.

त्यानंतर 20 व्या मिनिटाला मेस्सी मियामीला दुसरा गोल करून दिला. त्याने केलेल्या हा गोल पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. त्याने 30 मीटर दुरून अविश्वसनीय गोल केला.

Lionel Messi
Neymar Jr: रोनाल्डोनंतर आता नेमारवर सौदीतील फुटबॉल क्लबचा धनवर्षाव; संघात घेण्यासाठी मोजले तब्बल 800 कोटी...

त्यानंतर पहिल्या हाफच्या भरपाई वेळेत जॉर्डी आल्बाने मियामीसाठी तिसरा गोल नोंदवला. त्यामुळे मियामीला पहिला हाफ संपला, त्याचवेळी 3-0 अशी आघाडी मिळाली होती.

दरम्यान, दुसऱ्या हाफमध्ये फिलाडेल्फियाच्या अलेंजांद्रो बेडोयाने 73 व्या मिनिटाला पहिला गोल केला. पण, त्यानंतरही मियामीने फिलाडेल्फियाला वर्चस्व मिळवून दिले नाही. 84 व्या मिनिटाला मियामीच्या डेव्हिड रुइजने गोल करत आघाडी आणखी वाढवली. अखेर इंटर मियामीने हा सामना 4-1 अशा फरकाने जिंकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com