Prithvi Shaw  Dainik Gomantak
क्रीडा

Prithvi Shaw Controversy: अडकला नव्या वादात? भररस्त्यात पोरीसोबतच्या भांडणाचा Video व्हायरल

भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉचा भररस्त्यात भांडणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Prithvi Shaw Attacked By Fans: भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ सध्या मैदानाबाहेरील गोष्टींमुळे चर्चेत येत आहे. आता त्याच्याबद्दलचा नवा वाद समोर येताना दिसत आहे. मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलबाहेरील भांडणाचे प्रकरण सध्या समोर आले आहे.

रिपोर्ट्सनुसार काही लोकांच्या एका ग्रुपने पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्राचा पाठलाग केला आहे. या दरम्यान शॉच्या मित्राच्या गाडीवर हल्ला झाला असल्याचेही समजले आहे. त्याने काही चाहत्यांना सेल्फीसाठी नकार दिल्याने या घडामोडींना सुरुवात झाल्याचे समजत आहे.

शॉचा मित्र आशिष सुरेंद्र यादवने केलेल्या तक्रारीनुसार त्याच्या कारची बेसबॉल बॅटने तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणात ओशिवारा पोलिसांनी विविध कलमांअंतर्गत ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

शॉ त्याचा मित्र आशिषसह 15 फेब्रुवारी रोजी सांताक्रुझमधील एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. यादरम्यान एका व्यक्तीने त्याच्याबरोबर सेल्फीची मागणी केली. त्याने काही सेल्फी दिल्यानंतर काही लोक पुन्हा त्याच्याजवळ आले. त्यानंतर त्याने नकार दिला. यानंतर त्याने हॉटेल मॅनेजरकडेही तक्रार केली.

याप्रकरणात मॅनेजरने लक्ष घालत शॉला डिस्टर्ब न करण्यास सांगितले. पण रेस्टॉरंटमधून शॉ आणि आशिष बाहेर पडल्यानंतर सेल्फी मागणाऱ्या लोकांनी त्याला ट्रॅफिक सिग्नलजवळ रोखले आणि त्यांनी कारवर हल्ला केला.

आशिषने केलेल्या आरोपानुसार त्या लोकांनी त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली, तसेच त्यांच्याविरुद्ध खोटा आरोप करण्याची धमकी दिली होती.

दरम्यान, याच प्रकरणातील काही व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. यामध्ये शॉ एका मुलीबरोबर झटापट करतानाही दिसत आहे. तसेच ती मुलगी शॉ विरुद्ध तक्रार करताना दिसत असून तिच्याबरोबर असलेला एक व्यक्ती शॉविरुद्धचा पुरावा असल्याचा दावा करत आहे.

व्हिडिओमध्ये शॉवर आरोप करणारी मुलगी सपना गिल असल्याचे समजत आहे. तसेच रिपोर्ट्सनुसार सपना गिलचे वकील अली काशिफ खान यांनी आरोप केला आहे की शॉ याने सपनाला मारहाण केली आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत पूर्ण सत्य अद्याप समोर आलेले नाही.

दरम्यान शॉ गेल्या दीडवर्षापासून भारतीय संघातून दूर आहे. जानेवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत भारतीय संघात स्थान मिळाले होते. मात्र, मालिकेतील एकाही सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यात आले नव्हते.

शॉने आत्तापर्यंत 5 कसोटी सामने खेळले असून 339 धावा केल्या आहेत. तसेच 6 वनडे सामने खेळले असून 189 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने एकमेव आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला असून त्याला यात एकही धाव करता आलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT