Prithvi Shaw: मेहनतीचं फळ मिळालं! 'ट्रिपल सेंच्यूरी' करताच पृथ्वी शॉचे टीम इंडियात पुनरागमन

काहीदिवसांपूर्वीच त्रिशतक केलेल्या पृथ्वी शॉचे भारतीय टी20 संघात पुनरागमन झाले आहे.
Prithvi Shaw Selected for T20I Series Against New Zealand
Prithvi Shaw Selected for T20I Series Against New Zealand Dainik Gomantak
Published on
Updated on

Prithvi Shaw: बीसीसीआयने शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वनडे आणि टी20 मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. यातील टी20 मालिकेसाठी 23 वर्षीय पृथ्वी शॉ याची देखील निवड झाली आहे.

शॉ गेल्या काही दिवसापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये करत असलेल्या कामगिरीमुळे चर्चेत आहे. त्याने मुंबईकडून गेल्यावर्षापासून दमदार कामगिरी केली आहे.

त्याने नुकतेच आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात त्रिशतकी खेळी करताना सर्वांना चकीत केले होते. त्याने आसामविरुद्ध आक्रमक खेळ करताना 383 चेंडूत 379 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने तब्बल 49 चौकार आणि 4 षटकार मारले होते. त्यामुळे तो भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला होता.

Prithvi Shaw Selected for T20I Series Against New Zealand
Team India ची न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया मालिकांसाठी घोषणा, ईशान-सूर्याला कसोटीत संधी, तर रोहित-विराट...

तसेच शॉने सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी 2022-23 स्पर्धेमध्येही चांगली कामगिरी केली होती. तो सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी 2022 स्पर्धेत 332 धावांसह सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू होता. तसेच दुलीप ट्रॉफी 2022 स्पर्धेतही त्याने 105 च्या सरासरीने 315 धावा केल्या होत्या. शॉचा हा फॉर्म पाहाता त्याला पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

शॉ यापूर्वी जुलै 2021 मध्ये भारताकडून अखेरचा सामना खेळला होता. तेव्हापासून तो भारतीय संघातून बाहेर आहे. शॉने 2018 साली 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकल्यानंतर भारताच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले होते.

त्याने पहिल्याच कसोटी सामन्यात शतकी खेळीही केली होती. पण नंतर त्याला दुखापतीमुळे आणि नंतर प्रतिबंधित पदार्थ सेवनामुळे 2019 साली आलेल्या बंदीमुळे भारतीय संघापासून दूर राहावे लागले. पण त्याने नंतर बंदी संपल्यानंतर देशांतर्गत स्पर्धेत दमदार कामगिरी करत पुन्हा त्याची दखल घ्यायला लावली. पण तो संघातील जागा कायम राखू शकला नाही.

Prithvi Shaw Selected for T20I Series Against New Zealand
Ranji Trophy: पृथ्वी शॉची बॅट तळपली! 379 धावांची खेळी करताना दिग्गजांना टाकलं मागे

परंतु, आता पुन्हा त्याला भारतीय टी20 संघात संधी देण्यात आली असून त्याला संघातील त्याची जागा कायम ठेवण्यासाठी चांगली कामगिरी करावी लागणार आहे. त्याने आत्तापर्यंत भारताकडून 5 कसोटी, 6 वनडे आणि 1 टी20 सामना खेळला आहे.

त्याने खेळलेल्या 5 कसोटीत 1 शतक आणि 2 अर्धशतकांसह 339 धावा केल्या आहेत. तसेच वनडेत 189 धावा केल्या आहेत. मात्र, त्याने खेळलेल्या एकमेव टी20 सामन्यात तो शुन्य धावेवर बाद झाला होता.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ -

हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com