India Women vs England Women, 1st T20I at Wankhede Stadium, Mumbai, Playing XI, Shreyanka Patil and Saika Ishaque Debut:
इंग्लंड महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर असून बुधवारपासून टी20 मालिकेला सुरुवात झाली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड या महिला संघांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर बुधवारी होत आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकली असून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघाने श्रेयंका पाटील आणि सायका इशाक या दोन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. त्यामुळे अष्टपैलू श्रेयंका आणि डावखुरी फिरकीपटू सायका या दोघीही या सामन्यातून भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार आहेत.
28 वर्षीय सायकाने यावर्षी वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळताना चमकदार कामगिरी केली होती. तिच्या खेळाने अनेकांना तिने प्रभावित केले होते.
तसेच 21 वर्षीय श्रेयंकाने नुकतेच इंग्लंड अ संघाविरुद्ध टी20 सामने खेळले असून त्यात तिने 3 सामन्यातच 5 विकेट्स घेतल्या होत्या. भारतीय महिला संघाकडून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या त्या 79 आणि 80 व्या खेळाडू ठरल्या आहेत. त्यांच्यापूर्वी भारताकडून 78 महिला खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
कर्णधार हरमनप्रीतने सायकाला पदार्पणाची कॅप प्रदान केली, तर श्रेयंकाला पदार्पणाची कॅप उपकर्णधार स्मृती मानधनाच्या हस्ते मिळाली.
दरम्यान, याव्यतिरिक्त मोठे बदल दोन्ही संघात झालेले नाहीत.
भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात आत्तापर्यंत 27 टी20 सामने खेळवण्यात आले असून 7 सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे, तर 20 सामन्यांत इंग्लंडने विजय मिळवला आहे.
भारतीय महिला - स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), श्रेयंका पाटील, कनिका आहुजा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक
इंग्लंड महिला - डॅनियल व्याट, सोफिया डंक्ली, अॅलिस कॅप्सी, नॅट सायव्हर-ब्रंट, हिदर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (यष्टीरक्षक), फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, लॉरेन बेल, माहिका गौर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.