Goa Cancer Statistics: 5 वर्षांत गोव्‍यात 4,762 जणांचा कॅन्‍सरमुळे मृत्‍यू, प्रत्‍येक दिवशी सापडतात सरासरी पाच रुग्‍ण

8687 Cancer Cases Goa: गेल्‍या पाच वर्षांत राज्‍यात विविध प्रकारच्‍या कॅन्‍सरचे एकूण ८,६८७ रुग्‍ण आढळले.
Goa Cancer Statistics
Goa Cancer StatisticsDainik Gomantak
Published on
Updated on

Cancer Deaths Goa : गेल्‍या पाच वर्षांत राज्‍यात विविध प्रकारच्‍या कॅन्‍सरचे एकूण ८,६८७ रुग्‍ण आढळले आणि त्‍यातील ४,७६२ जणांचा मृत्‍यू झाल्‍याचे केंद्र सरकारने नुकत्‍याच जारी केलेल्‍या एका अहवालातून समोर आले आहे.

२०२१ पासून कॅन्‍सरग्रस्‍तांचे आणि त्‍यामुळे होणाऱ्या मृत्‍यूंचे प्रमाणही वाढतच चालले आहे. २०२१ ते २०२५ या पाच वर्षांच्‍या काळात जे ८,६८७ रुग्‍ण सापडले, त्‍यातून प्रत्‍येक दिवशी राज्‍यात सरासरी पाच रुग्‍ण सापडत असल्‍याचे आणि सरासरी दोन ते तीन जणांचा मृत्‍यू होत असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.

Goa Cancer Statistics
Goa CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत यांच्या प्रकृतीत सुधारणा; रिपोर्ट्स नॉर्मल आल्याने मिळणार डिस्चार्ज

गोव्‍यासह देशभरात वाढ असलेल्‍या कॅन्‍सर रुग्‍णांची आणि त्‍यामुळे होत असलेल्‍या मृत्‍यूंची संख्‍या रोखण्‍यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय पूर्णपणे प्रयत्‍नशील आहे.

त्‍यासाठी मंत्रालयाने ‘कर्करोग उपचार सुविधा बळकटीकरण योजना’ सुरू केली असून या योजनेअंतर्गत, देशभरात १९ राज्य कर्करोग संस्था आणि २० कर्करोग उपचार केंद्रे मंजूर केली आहेत.

आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गतही कॅन्‍सरग्रस्‍तांवर उपचार करण्‍यात येत आहेत. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दुय्यम व तृतीय स्तरावरील उपचारांसाठी प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य उपलब्ध आहे.

Goa Cancer Statistics
Goa Tourism: गोव्यातला 'स्वर्ग...'! शॉपिंग, बीच शॅक्स अन् अथांग सागराचं लावण्य अनुभवायचयं; 'हा' समुद्रकिनारा तुमच्यासाठी बेस्ट

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना आणि अफोर्डेबल मेडिसिन्स ॲण्ड रिलायबल इम्प्लांट्स फॉर ट्रिटमेंट या योजनांच्‍या माध्‍यमातून कर्करोगावरील परवडणारी औषधे, स्टेंट्स आणि इम्प्लांट्स यांची उपलब्धता करून दिली जात आहे. त्‍याचाही रुग्‍णांना फायदा होत असल्‍याचेही मंत्री प्रतापराव जाधव यांनी म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com