IND vs ENG: वानखेडेवर रंगणार भारत विरुद्ध इंग्लंड T20 सामन्यांचा थरार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

India Women vs England Women: भारत आणि इंग्लंड संघात बुधवारपासून टी20 मालिकेला वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होणार आहे.
India Women Cricket Team
India Women Cricket TeamBCCI
Published on
Updated on

India Women vs England Women T20I Series and Test Match:

भारतात सध्या क्रिकेटचा हंगात सुरू आहे. आता डिसेंबर महिन्यात भारतीय महिला क्रिकेट संघही मालिकांमध्ये व्यस्त राहणार आहे. इंग्लंड महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. त्यामुळे भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघात डिसेंबर महिन्यात 3 सामन्यांची टी20 मालिका आणि एक कसोटी सामना रंगणार आहे.

या दोन्ही मालिकांमध्ये भारताचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे, तर उपकर्णधार पदाची जबाबदारी स्मृती मानधनाकडे असणार आहे. 

दरम्यान, टी20 मालिकेतील तिन्ही सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहेत. तसेच कसोटी सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. टी20 मालिकेतील पहिला सामना ६ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर 9 आणि 10 डिसेंबर असे सलग दोन दिवस सामने होणार आहेत. यानंतर 14 ते 17 डिसेंबर दरम्यान कसोटी सामना होईल.

तिन्ही टी२० सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता चालू होणार आहेत, तर कसोटी सामन्यातील प्रत्येक दिवसाचा खेळ सकाळी 9.30 वाजता चालू होईल. दरम्यान, या सर्व सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे.

India Women Cricket Team
IND vs AUS: परंपरा कायम! पहिली टी20 मालिका जिंकताच कर्णधार सूर्यकुमारने कोणाकडे सोपवली ट्रॉफी, पाहा Video

टीव्ही आणि डिजिटवर कुठे पाहाणार सामना?

या सामन्यांचे टीव्हीवर स्पोर्ट्स18 नेटवर्कच्या चॅनेलवर थेट प्रक्षेपण होणार आहे, तर जिओ सिनेमावरही या सामन्यांचे प्रक्षेपण केले जाईल.

वेळापत्रक

भारत विरुद्ध इंग्लंड टी20 मालिका

6 डिसेंबर - पहिला टी20 सामना, वानखेडे स्टेडियम, मुंबई (वेळ - संध्या. 7 वाजता)

9 डिसेंबर - दुसरा टी20 सामना, वानखेडे स्टेडियम, मुंबई (वेळ - संध्या. 7 वाजता)

10 डिसेंबर - तिसरा टी20 सामना, वानखेडे स्टेडियम, मुंबई (वेळ - संध्या. 7 वाजता)

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना

14 ते 17 डिसेंबर, डीवाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई (वेळ - स. 9.30 वाजता)

India Women Cricket Team
IND vs AUS: 'अंपायरने त्यांचं काम केलं...', शेवटच्या ओव्हरमधील नाट्यमय घटनांनंतर हेडनचा पक्षपाताचा आरोप

असे आहेत संघ -

टी20 मालिकेसाठी भारतीय संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तितास साधू, पूजा वस्त्राकार, कनिका आहुजा, मिन्नू मणी

कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, शुभा सतीश, हरलीन देओल, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तितास साधू, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकार

टी20 मालिकेसाठी इंग्लंडचा संघ - हिदर नाइट (कर्णधार), लॉरेन बेल, माया बुचियर, अॅलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफिया डंक्ली,सोफी एक्लेस्टोन, माहिका गौर, डॅनियल गिब्सन, सारा ग्लेन, बेस हीथ, एमी जोन्स, फ्रेया केम्प, नॅट सायव्हर-ब्रंट, डॅनिएल व्याट

कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ - टॅमी ब्यूमॉन्ट, लॉरेन बेल, अॅलिस कॅप्सी, केट क्रॉस, चार्ली डीन, सोफिया डंक्ली, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फायलर, बेस हीथ, एमी जोन्स, हिदर नाइट (कर्णधार), एम्मा लॅम्ब, नॅट सायव्हर-ब्रंट, डॅनियल व्याट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com