

नास्नोळा परिसरातील पानारी येथील सर्व्हिस सेंटरजवळ एक ट्रक भरधाव वेगात जाऊन कंपाउंड भिंतीवर आदळल्याची घटना घडली. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून, जोरदार धडकेमुळे तो स्टेअरिंग कॅबिनमध्ये अडकून पडला होता. विशेषतः त्याच्या पायाला दुखापत झाल्याचे समोर आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परतेने बचावकार्य सुरू करत ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला सुरक्षित बाहेर काढले. बचावकार्य करताना विशेष काळजी घ्यावी लागली, कारण चालक कॅबिनमध्ये अडकला होता.
बाहेर काढल्यानंतर जखमी चालकाला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, प्राथमिक अंदाजानुसार वेगावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.