LPG Cylinder Shortage: व्यावसायिक सिलिंडरचा अजूनही तुटवडा, पणजीतील हॉटेलचालकांची अजूनही पळापळ सुरू

LPG Cylinder Shortage In Goa: राजधानीत अजूनही व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा सुरळीत झालेला नाही.
LPG Cylinder Shortage
LPG Cylinder ShortageDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राजधानीत अजूनही व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. अनेक हॉटेल, रेस्टॉरंटधारकांना सिलिंडर मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे, तर मेनू कार्डवरील काही पदार्थांवर लागलेली कात्री कायम ठेवावी लागली आहे.

घरगुती स्वयंपाकाचा सिलिंडर मिळवण्यासाठी शहरातील वितरकांच्या कार्यालयाबाहेर ज्या रांगा लागत होत्या, त्या आता कमी झाल्या आहेत.

LPG Cylinder Shortage
Goa Cancer Statistics: 5 वर्षांत गोव्‍यात 4,762 जणांचा कॅन्‍सरमुळे मृत्‍यू, प्रत्‍येक दिवशी सापडतात सरासरी पाच रुग्‍ण

अत्यावश्यक सेवांसाठी सिलिंडर प्रथम द्या, त्यानंतर हॉटेल व रेस्टॉरंटसाठी सिलिंडर द्यावेत, असे केंद्र सरकारने स्पष्ट सूचित केले आहे. त्यामुळे व्यवसायिक सिलिंडर मिळवणे हॉटेल व रेस्टॉरंट मालकांसमोर आव्हान ठरत आहे.

काही लहान हॉटेलधारकांनी आपला व्यवसाय बंद केला आहे. तर मोठ्या हॉटेलधारकांकडे मेनू कार्डवरील पदार्थांची कपात कायम ठेवली आहे.

LPG Cylinder Shortage
Goa CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत यांच्या प्रकृतीत सुधारणा; रिपोर्ट्स नॉर्मल आल्याने मिळणार डिस्चार्ज

गॅस सिलिंडरची कमतरता नाही : कामत

राज्यात घरगुती गॅस सिलिंडरची मुळीच कमतरता नाही; मात्र काही लोक बुकिंग न करता गॅस सिलिंडर विक्रेत्यांच्या दुकानावर जाऊन मागणी करतात. काहीजण रस्त्यावर गॅस सिलिंडरची वाहने अडवतात. हा बेशिस्तपणा असून असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी मडगावात स्पष्ट केले.

सरकारने आता व्यावसायिक गॅस सिलिंडरवर काही प्रमाणात निर्बंध घातले आहेत; मात्र त्याचा राज्यात किंवा राज्यातील पर्यटनावर मोठा परिणाम झालेला नाही. पुढील दोन दिवसांत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वितरण सुरळीत होईल, असे मंत्री कामत यांनी सांगितले. नागरिकांनी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यासंदर्भात निश्चिंत राहावे; घाबरू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

हॉटेल व रेस्टॉरंटधारकांकडून होणाऱ्या मागणीइतका पुरवठा होत नाही. अनेकांकडून दररोज सिलिंडरची मागणी होते, परंतु सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार पुरवठा केला जातो. व्यावसायिक सिलिंडर जेवढे मिळतात, तेवढे मागणी झालेल्यांना पुरवले जातात. येत्या काही दिवसांत पुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे.

- चिराग परमार, भारत गॅसचे वितरण प्रमुख.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com