India Women Hockey team X/TheHockeyIndia
क्रीडा

Jyoti Chhetri: एकीकडे 20 वर्षीय ज्योती भारतासाठी गाजवतेय हॉकीचं मैदान, तर दुसरीकडे घर रिकामं करण्याची आई-वडिलांना नोटीस

Jyoti Chhetri Hockey Player: भारतीय महिला संघाकडून खेळणाऱ्या ज्योती छेत्रीच्या कुटुंबाला त्यांचं राहतं घर रिकामं करण्याची नोटीस देण्यात आली आहे.

Pranali Kodre

India Women Hockey team player Jyoti Chhetri and her family fighting for their house:

ओडिशतील रुरकेला शहरामध्ये एफआयएच हॉकी प्रो लीग स्पर्धातील महिलांचे सामने खेळवण्यात आले. या स्पर्धेत भारताकडून 20 वर्षीय ज्योती छेत्री देखील खेळली. तिने भारतासाठी गेल्या काही सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली आहे.

फॉरवर्डला खेळणाऱ्या ज्योतीने 5S हॉकी वर्ल्डकपमध्ये भारताकडून रौप्य पदकही जिंकले आहे. मात्र, ती हॉकीचं मैदान गाजवत असली, तरी मात्र मैदानाबाहेर तिच्या कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे.

रुरकेलापासून 2 किमी अंतरावर तिचे घर आहे. या घरात तिने तिच्या आयुष्यातील 20 वर्षे व्यतीत केली आहेत. मात्र आता स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांना हे घर खाली करण्याची नोटीस बजावली आहे. कारण त्यांचे घर सरकारी जागेवर बांधलेले असून सध्या त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार ज्योतीचे वडील भीम छेत्री एक गवंडी असून 20 वर्षांपूर्वी ते या घरात त्यांच्या कुटुंबासह स्थायिक झाले होते.

भीम छेत्री यांनी इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सांगितले की 'मी 1988 साली रांचीतून रुरकेला आलो. जेव्हा मी पहिल्यांदा येथे आलो, तेव्हा मी हॉस्टेलवर वॉचमन म्हणून काम करत होतो. त्यांनीच दिलेल्या क्वार्टरमध्ये तेव्हा राहत होतो.

'मी त्यांच्या कँटिनमध्ये कूकचा मदतनीस म्हणून काम सुरू केले. नंतर माझं लग्न झालं आणि दोन मुलांचा जन्म झाला. त्यानंतर मला कुटुंबासह राहण्यासाठी ती जागा कमी पडू लागली.'

तसेच त्यांनी सांगितले की नंतर हॉस्टेलमधल्या अधिकाऱ्याने त्यांना हॉस्टेलच्या गेटबाहेर असलेल्या जागेत घर बांधण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिथे ते घर बांधून राहू लागले. तेव्हापासून ते तिथे राहत आहेत. पण दोन वर्षांपूर्वी स्थानिक अधिकाऱ्यांनी येऊन त्यांना घर रिकामे करण्यास सांगितले. त्यांनी 2025 ते 2026 पर्यंत घर खाली करण्यासाठी वेळ दिला आहे.

परंतु, नवीन घर किंवा जमीन घेण्यास पुरेसे पैसे नसल्याचे भीम छेत्री यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांकडे पुनर्वसानासाठी विनंती केली आहे. दरम्यान, याबाबत अद्याप त्यांना कोणतेही उत्तर मिळालेले नाही.

दरम्यान, ही जागा ज्या जिल्ह्यात येते त्या सुंदरगढच्या जिल्हाधिकारी पराग हर्षद यांनी आश्वासन गिले आहे की याबद्दल त्यांना सध्या फार काही माहित नाही, परंतु, त्यावर लक्ष दिले जाईल आणि ज्योतीच्या कुटुंबाला जी मदत लागेल, ती दिली जाईल.'

आता ज्योतीला आशा आहे की ती हॉकीमध्ये आणखी चांगली कामगिरी करेल आणि देशासाठी पुढेही खेळत राहिल. यातून ती कुटुंबाला आर्थिक मदत करू शकेल.

तथापि, घरासाठीच्या संघर्षादरम्यान ज्योतीला कोणताही दबाव न घेता खेळण्यास तिच्या वडिलांनी सांगितले आहे.

ज्योतीने गेल्यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून वरिष्ठ हॉरी संघाकडून पदार्पण केले होते. तेव्हापासून ती संघातील महत्त्वाची खेळाडू राहिली आहे. त्याआधी तिने ज्युनियर एशिया कप 2023 स्पर्धेतही भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT